Australia Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: ऑस्ट्रेलिया आठव्यांदा फायनलमध्ये! पाहा यंदा कोणाविरुद्ध मिळवले विजय अन् सामन्याचे हिरो

Australia Team: वर्ल्डकप 2023 स्पर्धेत आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया संघाने मिळवलेल्या विजयांचा घेतलेला आढावा.

Pranali Kodre

Australia Team Journey in ICC ODI Cricket World Cup 2023:

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. 

या अंतिम सामन्याआधी ऑस्ट्रेलियाने सलग 8 विजय मिळवले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया तब्बल आठव्यांदा वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 1975, 1987, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला आहे. यातील 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 साली ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला आहे.

दरम्यान वनडे वर्ल्डकपमध्ये भारताचा आत्तापर्यंतचा प्रवास कसा होता, याकडे एक नजर टाकू.

साखळी फेरी

  • पहिला सामना - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (चेन्नई)

भारतीय संघाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. या सामन्यात नाबाद 97 धावा करणारा राहुल सामनावीर ठरला.

  • दुसरा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (लखनऊ)

दक्षिण आफ्रिकेने हा सामना 134 धावांनी जिंकला. या सामन्यात 109 धावांची खेळी करणारा क्विंटन डी कॉक सामनावीर ठरला.

  • तिसरा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (लखनऊ)

ऑस्ट्रेलियाने हा सामना 5 विकेट्सने जिंकला. या सामन्यात 8 षटकात 47 धावा देत 4 विकेट्स घेणारा ऍडम झम्पा सामनावीर ठरला.

  • चौथा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान (बंगळुरू)

ऑस्ट्रेलियाने हा सामना 62 धावांनी जिंकला. या सामन्यात 124 चेंडूत 163 धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सामनावीर पुरस्कार पटकावला.

  • पाचवा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स (दिल्ली)

ऑस्ट्रेलियाने हा सामना तब्बल 309 धावांनी जिंकला. या सामन्यात 44 चेंडूत 106 धावा करणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीर ठरला.

  • सहावा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (धरमशाला)

ऑस्ट्रेलियाने हा सामना अवघ्या 5 धावांनी जिंकला. या सामन्यात 109 धावांची खेळ करणाऱ्या ट्रेविस हेडने सामनावीर पुरस्कार जिंकला.

  • सातवा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (अहमदाबाद)

ऑस्ट्रेलियाने हा सामना 33 धावांनी जिंकला. या सामन्यात 10 षटकात 21 धावा देत 3 विकेट्स घेणाऱ्या ऍडम झम्पाने सामनावीर पुरस्कार मिळवला.

  • आठवा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान (मुंबई)

ऑस्ट्रेलियाने हा सामना 3 विकेट्सने जिंकला. या सामन्यात नाबाद 201 धावा करणारा ग्लेन मॅक्सवेल सामनावीर ठरला.

  • नववा सामना - ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश (पुणे)

ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 विकेट्सने जिंकला. या सामन्याच 177 धावांची खेळी करणारा मिचेल मार्श सामनावीर ठरला.

  • उपांत्य फेरी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (कोलकाता)

ऑस्ट्रेलियाने हा सामना 3 विकेट्सने जिंकला. या सामन्यात 62 धावांची खेळी करणारा ट्रेविस हेडने सामनावीर पुरस्कार जिंकला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT