Shubman Gill | KL Rahul Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, 2nd ODI: गिल-अय्यरच्या शतकांनंतर केएल-सूर्याचा झंझावात! भारताचे ऑस्ट्रेलियाला 400 धावांचे आव्हान

India vs Australia: भारतीय संघाने दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचे आव्हान ठेवले आहे.

Pranali Kodre

Australia need runs to win 2nd ODI at Indore against India:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी होत आहे. इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 400 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. भारतीय संघाने 50 षटकात 5 बाद 399 धावा केल्या आहेत.

या सामन्यात भारताकडून शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांनी सुरुवात केली. पण ऋतुराज 8 धावांवर बाद झाला. मात्र, यानंतर गिल आणि श्रेयस अय्यर यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनीही आक्रमक खेळ केला. त्यांनी 200 धावांची भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी केली.

या भागीदारीदरम्यान श्रेयस अय्यरने शतक केले. पण शतकानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 90 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 105 धावांची खेळी केली. तसेच नंतर शुभमन गिलने लय कायम ठेवत शतक ठोकले. मात्र, तोही शतकानंतर बाद झाला. त्याने 92 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह शतक साजरे केले. 

हे दोघेही बाद झाल्यानंतर इशान किशन आणि कर्णधार केएल राहुलने डाव सांभाळला. पण इशान 31 धावांवर बाद झाला. मात्र, नंतर केएल राहुलला सूर्यकुमार यादवने साथ दिली. या दोघांनीही आक्रमक खेळ केला. त्यातही सूर्यकुमारने तडाखेबंद फटकेबाजी केली.

या दोघांनीही अर्धशतक झळकावले. पण केएल राहुल 46 व्या षटकात 52 धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतरही सूर्यकुमारने आपली लय कायम ठेवत भारताला धावांचा डोंगर उभारून दिला. सूर्यकुमार 37 चेंडूत 72 धावांवर नाबाद राहिला. तसेच रविंद्र जडेजा 13 धावांवर नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच जोश हेझलवूड, सीन ऍबॉट आणि ऍडम झम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेट जगतात खळबळ! रोहित-विराटच्या निवृत्तीचा 'डाव' गंभीरने रचला? पुजारानंतर आणखी एका खेळाडूचा 'हल्लाबोल'

Goa Politics: खरी कुजबुज; 'त्या' भावी नगरसेवकांना हवाय युरीचा आशीर्वाद!

Goa Live News: बोणबाग बेतोडावासीयांचा इशारा! 'शिवाजी नगर'साठी नवी पाईपलाईन बसवण्याचे काम रोखणार

IFFI Goa 2025: इफ्फीच्या उद्‍घाटनाच्या चित्रपटाचे सिनेकर्मींना आमंत्रण का नाही? 'फिल्म मेकर्स'चा सवाल; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

Goa Crime: दक्षिण गोव्‍यात सात दिवसांत चार अल्‍पवयीनांची अपहरणे, एका प्रकरणाचा छडा; तीन तपासाविना प्रलंबित

SCROLL FOR NEXT