Australia Team Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: वर्ल्ड कपमधील इंग्लंडचे आव्हान संपुष्टात; कांगारुंनी दिली 33 धावांनी मात

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 36व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 33 धावांनी पराभव केला आहे.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 36व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 33 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीच्या जवळ पोहोचला आहे. तर इंग्लंडचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 49.3 षटकात सर्व गडी गमावून 286 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ डेव्हिड मलान आणि बेन स्टोक्सच्या अर्धशतकांसह 48.1 षटकांत केवळ 253 धावाच करु शकला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने तीन, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्सने 2-2 विकेट घेतल्या.

दरम्यान, 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची (England) सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. बेअरस्टोला खातेही उघडता आले नाही.

जो रुट पुन्हा अपेक्षेप्रमाणे कामगिरी करु शकला नाही आणि 17 चेंडूत 13 धावा करुन बाद झाला. यानंतर बेन स्टोक्स आणि डेव्हिड मलान यांनी डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली. डेव्हिड मलान 64 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला.

कर्णधार जोस बटलरला 7 चेंडूत एकच धाव करता आली. बेन स्टोक्स 90 चेंडूत 64 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. स्टोक्स बाद होताच इंग्लंडच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. लिव्हिंगस्टोनला केवळ दोन धावा करता आल्या. डेव्हिड विलीने 15 धावांचे योगदान दिले.

दुसरीकडे, प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 49.3 षटकांत सर्व गडी गमावून 286 धावाच करु शकला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने चार, तर आदिल रशीद आणि मार्क वुडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लॅबुशेनने सर्वाधिक 71 धावा केल्या. गुणतालिकेत इंग्लंड 2 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

मार्नस लॅबुशेन (83 चेंडूत 71 धावा) याने स्टीव्ह स्मिथ (52 चेंडूत 44) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली आणि कॅमेरॉन ग्रीन (52 चेंडूत 47 धावा) सोबत पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी करुन ऑस्ट्रेलियाला (Australia) सुरुवातीपासून मोठ्या धक्कापासून वाचवले.

खालच्या क्रमवारीत मार्कस स्टॉयनिस (32 चेंडूत 35) आणि अॅडम झाम्पा (19 चेंडूत 29) यांनी उपयुक्त योगदान दिले. झम्पाने मिचेल स्टार्कसोबत (10) नवव्या विकेटसाठी 38 धावांची उपयुक्त भागीदारी केली. डावाच्या शेवटच्या षटकात दोघांनाही बाद करुन वोक्सने ऑस्ट्रेलियाला 300 धावांचा टप्पा गाठू दिला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Market: 200 वर्षांची परंपरा धोक्यात! 'भायले' व्यापारी आल्याने गोमंतकीय दुकानदारांचा व्यवसाय थंड

Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

गुंड जेनिटोची दिवाळी तुरुंगातच; रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी सर्व संशयितांना 31 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

SCROLL FOR NEXT