Sandpaper Gate controversy Dainik Gomantak
क्रीडा

Sandpaper Gate controversy: 8 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा भूकंप! सँडपेपर गेट प्रकरणाची होणार नव्याने चौकशी; स्टार्क-कमिन्ससह खेळाडूंची कोंडी?

Australian Cricket Sandpaper Scandal: ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये 2018 मध्ये झालेल्या बहुचर्चित 'सँडपेपर गेट' प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे.

Sameer Amunekar

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये 2018 मध्ये झालेल्या बहुचर्चित 'सँडपेपर गेट' प्रकरणाची पुन्हा चौकशी होणार आहे. तब्बल आठ वर्षांनंतर हे प्रकरण नव्याने चर्चेत आले असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने यासाठी स्वतंत्र समीक्षा पॅनेलची नियुक्ती केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 2018 मधील कसोटी दौऱ्यात घडलेल्या बॉल टॅम्परिंगच्या घटनेशी संबंधित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळणार आहे. या निर्णयामुळे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यासह त्या काळातील ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडू पुन्हा चर्चेत आले आहेत.

उस्मान ख्वाजाच्या पुस्तकामुळे जुन्या वादाला पुन्हा हवा

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू उस्मान ख्वाजा याच्या 'सबर' या पुस्तकामुळे या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली. ख्वाजाने आपल्या पुस्तकात दावा केला की, 2018 मधील बॉल टॅम्परिंगच्या प्रयत्नांची माहिती संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला होती. त्यामुळे या प्रकरणात केवळ कॅमेरून बॅनक्रॉफ्ट, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनाच शिक्षा देणे योग्य नव्हते, असे त्याचे मत आहे.

ख्वाजाच्या या दाव्यानंतर ऑस्ट्रेलियातील माजी आणि सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये मतभेद समोर आले. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ख्वाजाच्या दाव्याशी असहमती दर्शवली. दुसरीकडे, माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ख्वाजाच्या भूमिकेला पाठिंबा दिला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. त्या वेळी दिलेल्या निवेदनावर आपण आजही ठाम असल्याचे त्याने सांगितले. तसेच इतर खेळाडूंना या प्रकाराची माहिती नव्हती, असेही त्याने म्हटले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून स्वतंत्र समीक्षा पॅनेलची नियुक्ती

या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ अधिवक्ता फियोना मॅकलिओड एओ एससी यांची स्वतंत्र समीक्षा पॅनेलच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे पॅनेल 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर घडलेल्या घटनांचा आढावा घेणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार, ही समीक्षा प्रक्रिया साधारण सहा आठवडे चालणार आहे. त्यानंतर पॅनेल आपला अहवाल आणि शिफारसी सादर करेल. विशेष म्हणजे, हा अहवाल आणि त्यातील शिफारसी सार्वजनिक केल्या जाणार आहेत. या प्रक्रियेत त्या दौऱ्यात सहभागी असलेल्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला आपले अनुभव मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष डेव्हिड बून यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित सर्वांना कोणत्याही परिणामांची भीती न बाळगता आपली बाजू मांडता यावी, हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. सुरक्षित वातावरणात खेळाडू आणि स्टाफला आपले अनुभव सांगता येतील. त्यातून त्या दौऱ्यातील घटना आणि त्यानंतर झालेल्या चौकशीबाबत अधिक माहिती मिळण्यास मदत होईल.

नेमकं काय घडलं होतं 2018 मध्ये?

2018 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे कसोटी सामना खेळला जात होता. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट चेंडूवर सँडपेपरसारख्या वस्तूने घासून त्याची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता. या घटनेला पुढे 'सँडपेपर गेट' किंवा बॉल टॅम्परिंग प्रकरण म्हणून ओळखले जाऊ लागले.

या प्रकरणात तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर कारवाई करण्यात आली. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एक वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती.

या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लायन यांनी संयुक्त निवेदन देत सँडपेपर मैदानावर नेण्याची माहिती आपल्याला नव्हती, असे स्पष्ट केले होते. मात्र, आठ वर्षांनंतर ख्वाजाने केलेल्या दाव्यांमुळे या जुन्या प्रकरणातील अनेक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. आता नव्या समीक्षा पॅनेलच्या अहवालातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Screenwriters Lab: महिलांच्या कथांना मिळणार चित्रपटाचे रूप; गोव्यात ‘स्क्रिनरायटर्स लॅब’ सुरू होणार

Private Land Encroachment: खासगी जमिनीवर रस्ता बांधण्याचा अधिकार कुणी दिला? उच्च न्यायालयाने प्रशासनाला फटकारले

Goa Politics: प्रत्येक कुटुंबाला दरमहा 15 हजारांचा लाभ! सत्तेत येताच मोफत वीज देण्याचे 'आप'चे आश्वासन

कोण होणार मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन? रोहित, सूर्या की बुमराह? सायंकाळी 5.45 वाजता अधिकृत घोषणा, चाहते म्हणतायत 'मुंबईचा राजा'च पुन्हा गादीवर बसणार!

Goa Politics: काँग्रेसचे 'घर-घर चलो अभियान', मडगावातील संविधान बचाव सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

SCROLL FOR NEXT