Australia Team  Dainik Gomantak
क्रीडा

AUS vs SA: कांगारु गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डर 'फेल'; पॉवरप्लेमध्ये केला लाजिरवाणा रेकॉर्ड

Australia Team: या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया आमने-सामने आहेत.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार टेम्बा बावुमाचा हा निर्णय योग्य ठरला नाही आणि आफ्रिकेने 15 षटकांत चार विकेट गमावल्या.

मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी तगडी गोलंदाजी करत आफ्रिकेच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पॉवरप्लेमध्ये धोकादायक सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलमडली.

आफ्रिकेने सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत आपला सर्वात कमी पॉवरप्ले स्कोअर आणि विश्वचषकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात कमी पॉवरप्ले स्कोअर केला आहे.

दरम्यान, पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ दोन विकेट्स गमावून केवळ 18 धावा करु शकला. मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूडला खेळपट्टी आणि हवामानाचा फायदा झाला. मात्र, पॉवरप्लेमध्ये धोकादायक सुरुवात करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची टॉप ऑर्डर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलमडली.

सतत विकेट पडल्यानंतर पावसानेही दार ठोठावले. विश्वचषक 2023 मध्ये एका डावात पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावसंख्या करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. श्रीलंकेच्या संघाने 10 षटकांत 14 धावा करताना 6 विकेट गमावल्या होत्या.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दोन विकेट्स गमावून 18 धावा केल्या. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे.

वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोस हेझलवूड यांच्या प्रत्येकी दोन बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत पावसामुळे खेळ थांबेपर्यंत दक्षिण आफ्रिकेचे 14 षटकांत 44 धावांत चार विकेट्स घेतल्या. पाऊस येण्यापूर्वी हेन्रिच क्लासेन आणि डेव्हिड मिलर प्रत्येकी 10 धावा करुन क्रीजवर उपस्थित होते.

विश्वचषक 2023 मधील सर्वात कमी पॉवरप्ले स्कोअर

14-6 SL विरुद्ध भारत

𝟭𝟴-𝟙 दक्षिण आफ्रिकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया

27-3 भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया

23-2 नेदरलँड्सविरुद्ध इंग्लंड

विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पहिल्या 10 षटकांमध्ये सर्वात कमी धावसंख्या

12/2 वि न्यूझीलंड, सेंट जॉर्ज, 2007

18/2 वि ऑस्ट्रेलिया, ईडन गार्डन्स, 2023 SF

27/5 वि ऑस्ट्रेलिया, ग्रॉस आइलेट, 2007 SF

28/2 वि ZIM, हॅमिल्टन, 2015

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Xelvan Jetty: 'शेळवण जेटी' प्रकल्पाला कडाडून विरोध! पणजीत निदर्शने; पाटकर काब्राल शाब्दिक द्वंद्व

Maha Andolan: आझाद मैदानावर शेकडो नागरिक एकवटले! 39 A विरोधात महाआंदोलन; पोलिसांचा कडेकोट पहारा

Viral Video: 'विषयच हार्ड'! पठ्ठ्यांनी बनवली 6 चाकांची बाईक, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, 'हे टेक्निक देशाबाहेर जाता कामा नये!'

Arijit Singh Ek Din Song: 'अरिजीत सिंग इज बॅक'! नवीन गाणे घालते आहे धुमाकूळ; आमिर खानने भेटून केला चमत्कार Watch Video

Arambol Beach: "गोवा पूर्वी किती भारी होता"! हरमल बीचचे 1980 सालचे फोटो Social Media वर व्हायरल; पर्यटक झाले इमोशनल Watch Photos

SCROLL FOR NEXT