South Africa Team  Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला धुतलं, पहिल्या दोन सामन्यात केल्या रेकॉर्डब्रेक धावा!

Manish Jadhav

AUS vs SA, World Cup 2023: दक्षिण आफ्रिकेच्या संघाच्या फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विशेषत: क्विंटन डी कॉक ज्याने श्रीलंकेविरुद्ध 84 चेंडूत 100 धावा केल्या होत्या.

आता ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याने 109 धावांची खेळी केली. त्याने विश्वचषकात सलग दोन शतके झळकावून विक्रम केला. संपूर्ण संघाने कांगारुंच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात पहिल्यांदा खेळताना आफ्रिका संघाने 311 धावा केल्या.

भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता आणि आता येथे विजय मिळवायचा असेल तर त्यांना 312 धावा कराव्या लागतील.

दोन सामन्यात 739 धावा केल्या

दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) संघाने पहिल्या दोन सामन्यात 739 धावा केल्या आहेत. स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच या संघाला अंडरडॉग म्हटले जात होते. परंतु पहिल्या दोन सामन्यांमध्ये आफ्रिकेच्या संघाने आपली क्षमता दाखवून दिली.

पहिल्या सामन्यात संघाने श्रीलंकेविरुद्ध 428 धावांचा विक्रम केला होता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध 311 धावा केल्या. एकूण, संघाने आतापर्यंत दोन सामन्यांत 739 धावा केल्या आहेत. या संघाने दोन सामन्यांत चार शतकेही झळकावली आहेत.

डी कॉकने विक्रमी हॅटट्रिक केली

क्विंटन डी कॉकने एकदिवसीय विश्वचषकात सलग दुसरे शतक झळकावले. आपल्या शतकी खेळीत डी कॉकने 8 चौकार आणि 5 शानदार षटकार मारले. या शतकासह डी कॉक दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या खास क्लबमध्ये सामील झाला.

एकदिवसीय विश्वचषकात सलग दोन शतके झळकावणारा डी कॉक आता डीव्हिलियर्सनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे.

दुसरीकडे, आफ्रिकन संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा डी कॉक हा दुसरा सलामीवीर ठरला. आता त्याच्या नावावर 19 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय शतके आहेत. त्याचे हे ऑस्ट्रेलियाविरुद्धचे तिसरे शतक होते.

कांगारु संघाविरुद्ध सर्वाधिक शतके ठोकणारा तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. आफ्रिकेसाठी सर्वाधिक शतके फाफ डू प्लेसिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 5 शतके झळकावली. हर्शल गिब्स आणि डी कॉक यांनी प्रत्येकी 3 शतके झळकावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह, संशयास्पद मृत्यू असल्याचा कुटुंबियांचा अंदाज!

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

SCROLL FOR NEXT