ATK Mohan Bagan Dainik Gomantak
क्रीडा

एटीके मोहन बागानची दणदणीत विजयी सलामी; केरळा ब्लास्टर्सवर 4-2 फरकाने मात

गतउपविजेत्या एटीके मोहन बागानने (ATK Mohan Bagan) शुक्रवारी इंडियन सुपर लीग ( ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात दणदणीत विजयी सलामी दिली.

दैनिक गोमन्तक

पणजी: गतउपविजेत्या एटीके मोहन बागानने (ATK Mohan Bagan) शुक्रवारी इंडियन सुपर लीग ( ISL) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात दणदणीत विजयी सलामी दिली. क्लब ट्रान्स्फरमध्ये विक्रमी रक्कम मिळालेला ह्युगो बुमूस याच्या दोन गोलच्या बळावर त्यांनी केरळा ब्लास्टर्सला 4-2 फरकाने हरविले. सामना फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर (Pandit Jawaharlal Nehru Stadium) झाला.

मोरोक्कन ह्युगो बुमूस (3 व 39वे मिनिट) याच्या दोन गोलव्यतिरिक्त एटीके मोहन बागानच्या विजयात फिजीचा रॉय कृष्णा (27वे मिनिट, पेनल्टी) आणि गोमंतकीय लिस्टन कुलासो (50वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल केला. केरळा ब्लास्टर्सतर्फे सहल समद (24वे मिनिट) व अर्जेंटिनाचा जोर्जे डायझ (69वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून पिछाडी कमी केली.

सामन्याची सुरवात सनसनाटी ठरली. सामन्याच्या तिसऱ्या मिनिटास लिस्टन कुलासोने मैदानाच्या डाव्या बाजूने दिलेल्या असिस्टवर बुमूसने प्रतिस्पर्धी गोलरक्षक आल्बिनो गोम्स याला चकवा देत मोसमातील पहिला गोल नोंदविला. गतमोसमात मुंबई सिटीतर्फे खेळलेल्या 26 वर्षीय खेळाडूचा हा कोलकात्यातील संघातर्फे पहिलाच गोल ठरला. 24व्या मिनिटास भारताचा आंतरराष्ट्रीय खेळाडू सहल समद याने सनसनाटी गोल केला. केपी राहुल याने मैदानाच्या उजव्या बाजूतून दिलेल्या पासवर समदने केरळास बरोबरी साधून दिली, पण त्यांचा हा आनंद तीन मिनिटेच टिकला. फिजीचा आंतरराष्ट्रीय अनुभवी रॉय कृष्णाने गोलरक्षक आल्बिनोचा अंदाज चुकविताना पेनल्टी फटक्यास अचूक दिशा दाखविली. विश्रांतीस सहा मिनिटे बाकी असताना बुमूसने सामन्यातील वैयक्तिक दुसरा गोल केला.

विश्रांतीनंतर पाचव्याच मिनिटास भारताचा युवा आंतरराष्ट्रीय लिस्टनने एटीके मोहन बागानची आघाडी 4-1 अशी मजबूत केली. कोट्यवधी करार मिळालेल्या या 23 वर्षीय आघाडीपटूने रॉय कृष्णाच्या असिस्टवर गोलरक्षक आल्बिनोला सावरण्याची अजिबात संधी दिली नाही. आयएसएल स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणारा जोर्जे डायझ याने ॲड्रियन लुना याच्या असिस्टवर केरळा ब्लास्टर्सची पिछाडी 2-4 अशी कमी केली.

दृष्टिक्षेपात...

  • एफसी गोवा, मुंबई सिटीतर्फे खेळलेल्या ह्युगो बुमूसचे एटीके मोहन बागानतर्फे 2 गोल

  • एकंदरीत 59 आयएसएल सामन्यात बुमूसचे 21 गोल

  • रॉय कृष्णाचे एटीके मोहन बागानतर्फे तिसऱ्या आयएसएल मोसमातील 45 सामन्यात 30 गोल

  • यापूर्वी गोवा, हैदराबादकडून खेळलेल्या लिस्टन कुलासोचा एटीके मोहन बागानतर्फे पहिलाच गोल,

  • लिस्टनचे आता एकूण 32 सामन्यात 5 गोल

  • सहल समद याचे 52 आयएसएल सामन्यात 2 गोल

  • पहिलाच आयएसएल सामना खेळणाऱ्या जोर्जे डायझचे गोलसह पदार्पण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फुल पैसा वसूल! रोहित शेट्टी आणतोय 'Golmaal 5', गोव्यात होणार शूटिंगची सुरुवात; अजय देवगणनं दिलीये हिंट

Delhi Airport Technical Glitch: 800 फ्लाईट्सना विलंब, अनेक रद्द; दिल्ली विमानतळावर तांत्रिक अडचणीचा हजारो प्रवाशांना फटका

"तुझी मासिक पाळी संपली की सांग...": महिला क्रिकेटपटूचा सिलेक्टरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, क्रीडा विश्वात खळबळ

समुद्रकिनारी रंगला भव्य विवाह! तेजश्री प्रधानने गोव्याच्या किनाऱ्यावर केलं 'Destination Wedding' शूट

Goa Today's News Live: काणकोण बसस्थानकाजवळील रस्त्याची दुर्दशा, चालक हैराण

SCROLL FOR NEXT