Athletics Federation of India has declared August 8 as Javelin Throw Day Dainik Gomantak
क्रीडा

Neeraj Chopra: 7 ऑगस्ट 'भाला फेक दिवस' म्हणुन साजरा केला जाणार

Javelin Throw Day: 7 ऑगस्टला नीरजने फेकलेल्या भाल्याने फक्त 87.58 मीटरचे अंतरच पार केले नाही तर देशातील त्या प्रत्येक खेळाडूसाठी एक प्ररणा निर्माण केली.

दैनिक गोमन्तक

नीरज...हे नाव आता प्रत्येक भारतीयाला माहिती आहे. हे त्या खेळाडूचे नाव आहे, ज्याने ऑलिम्पिकम 2020 (Olympics 2020) मध्ये 7 ऑगस्ट विक्रमी भाला फेकला आणि भारताचे नाव रोषण केले. ऑलिम्पिकमध्ये भारताला यापुर्वी गोल्ड मेडल मिळालं होतं, मात्र एथलॅटीक्समध्ये मिळालेलं हे पहिलं गोल्ड मेडल. त्यामुळे नीरज चोप्राची (Neeraj Chopra) ही कामगिरी ऐतिहासिक आहे. त्यानिमीत्तानेच एथलॅटीक्स फेडरेशन ऑफ इंडीयाने 7 ऑगस्ट हा दिवस भालाफेक दिवस म्हणुन साजरा केला जाणार असल्याचे घोषित केले आहे. (Athletics Federation of India has declared August 7 as Javelin Throw Day)

भालाफेक मध्ये नीरज चोप्राने दमदार कामगिरी करत पहिल्याच प्रयत्नात 87.03 अशी उत्तम भालाफेक केला होता. तर दुसऱ्या प्रयत्नात सुद्धा 87.58 असा विक्रमी भाला फेकला आणि सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. 7 ऑगस्टला नीरजने फेकलेल्या भाल्याने फक्त 87.58 मीटरचे अंतरच पार केले नाही तर देशातील त्या प्रत्येक खेळाडूसाठी एक प्ररणा निर्माण केली.

नीरजच्या या उत्तंग यशामागे असलेल्या परिश्रमांता सन्मान आणि भविष्यात इतर खेळांडूंनीही असेच यश मिळवावे याच हेतुन एथलॅटीक्स फेडरेशन ऑफ इंडीयाने हा दिवस जॅवेलीन थ्रो डे म्हणुन साजरा केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT