asian games 2026 india gold medal kamaljeet singh suruchi Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2026: कमलजीत आणि सुरुचीचा 'गोल्ड' निशाणा! नेमबाजीत भारतानं जिंकलं सुवर्णपदक; कोरियाच्या तगड्या आव्हानाला दिलं चोख प्रत्युत्तर

India Second Gold Medal At Asian Games: एशियन गेम्समध्ये (2026) भारताने सुवर्ण कामगिरी करत आपले दुसरे सुवर्णपदक पटकावले. 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स्ड इव्हेंटमध्ये भारताच्या खेळाडूंनी अचूक निशाणा साधत हे सोनेरी यश मिळवले.

Manish Jadhav

Asian Games 2026 India Gold Medal Shooting: एशियन गेम्समध्ये (2026) भारताने सुवर्ण कामगिरी करत आपले दुसरे सुवर्णपदक पटकावले. 10 मीटर एअर पिस्तूल मिक्स्ड इव्हेंटमध्ये भारताच्या खेळाडूंनी अचूक निशाणा साधत हे सोनेरी यश मिळवले. या आधी भारताचे पहिले सुवर्णपदक महिला क्रिकेट संघाने जिंकले, तर आता या नव्या विजयामुळे स्पर्धेतील भारताच्या एकूण पदकांची संख्या 19 वर पोहोचली. भारताच्या या विजयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून क्रीडा जगतातून संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कमलजीत सिंह आणि सुरुची या भारतीय जोडीने या अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच उत्कृष्ट कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघावर आपली पकड मजबूत ठेवली होती. दक्षिण कोरियाचा संघ सातत्याने भारतीय खेळाडूंवर दबाव बनावण्याचा प्रयत्न करत होता, परंतु भारतीय जोडीने दबावाखाली अत्यंत संयमाने खेळ केला. अखेर दक्षिण कोरियाला 6.6 गुणांच्या मोठ्या फरकाने पराभूत करत भारताने (India) सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या चुरशीच्या सामन्यात दक्षिण कोरियाने 478 चा स्कोर केला, तर इराणने 415.8 गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

विशेष म्हणजे, कमलजीत आणि सुरुची या दोघांनी क्वालिफिकेशन राऊंडपासूनच आपला दम दाखवत पहिला क्रमांक मिळवला होता. अंतिम सामन्याच्या पहिल्या सीरिजमध्येच भारतीय जोडीने 4.9 गुणांची भक्कम आघाडी घेतली होती, जी नेमबाजीत खूप महत्त्वाची मानली जाते. दुसऱ्या सीरिजमध्ये कोरियाई संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे भारताची आघाडी कमी होऊन 1.2 गुणांवर आली होती. मात्र, शेवटच्या क्षणांपर्यंत संयम राखत कमलजीत आणि सुरुची यांनी विजय निश्चित केला.

या सुवर्णपदकासह 2026च्या एशियन गेम्समध्ये आता भारताकडे एकूण 19 पदके जमा झाली आहेत. यामध्ये 2 सुवर्ण, 8 रौप्य आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. तसेच पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन्स प्रकारात भारताने रौप्य पदकही आपल्या नावावर केले. भारतीय खेळाडूंच्या या शानदार कामगिरीमुळे देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT