Asian Games 2026 India vs South Korea Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

Asian Games 2026 India vs South Korea: एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम आहे. पूल ए मधील सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा तब्बल 8-2 असा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला.

Sameer Amunekar

एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाची विजयी घोडदौड कायम आहे. पूल ए मधील सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा तब्बल 8-2 असा पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. या सामन्यात स्ट्रायकर दिलप्रीत सिंहने शानदार हॅट्ट्रिक करत भारताच्या मोठ्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयामुळे भारताने गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले असून उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झाले आहे.

दिलप्रीत सिंहचा भन्नाट खेळ

भारताकडून दिलप्रीत सिंहने आक्रमणाची धुरा सांभाळताना तीन गोल केले. त्याने 10व्या, 26व्या आणि 32व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याच्या वेगवान हालचाली आणि गोल करण्याच्या अचूकतेसमोर कोरियाच्या बचावफळीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

अभिषेकनेही दोन गोल करत भारताच्या विजयात मोलाची भर घातली. शिलानंद लाकरा, कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि राजिंदर सिंह यांनी प्रत्येकी एक गोल केला. कोरियाकडून किम जे हो आणि किम योंग बोक यांनी गोल करत संघाचे खाते उघडले.

पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताचा दबदबा

सामना सुरू झाल्यानंतर भारताने सुरुवातीपासूनच आक्रमक हॉकी खेळण्यास सुरुवात केली. चौथ्याच मिनिटाला शिलानंद लाकरा याने भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिलप्रीतने 10व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी केली.

याच्या अवघ्या एका मिनिटानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत शानदार ड्रॅग-फ्लिकद्वारे गोल केला. त्यामुळे भारताने 3-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस अभिषेकने आणखी एक गोल करत भारताला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या क्वार्टरमध्येही गोलचा धडाका

भारताचा आक्रमक खेळ दुसऱ्या क्वार्टरमध्येही कायम राहिला. दिलप्रीतने मनदीप सिंहच्या शानदार क्रॉसचा फायदा घेत गोल केला आणि आपली वैयक्तिक गोलसंख्या दोनवर नेली. त्यानंतर अभिषेकने रिबाउंडवर गोल करत भारताची आघाडी आणखी वाढवली.

भारतीय खेळाडू सातत्याने कोरियाच्या गोलपोस्टवर दबाव निर्माण करत होते. भारताच्या वेगवान पासिंग आणि आक्रमक रणनीतीमुळे कोरियाला बचावावरच अधिक लक्ष केंद्रित करावे लागले.

कोरियाने खाते उघडले, पण भारताचा विजय निश्चित

सामन्याच्या पुढील टप्प्यात कोरियाने भारताच्या आक्रमणाला काही प्रमाणात रोखण्याचा प्रयत्न केला. किम जे होने गोल करत कोरियाचे खाते उघडले. त्यानंतर किम योंग बोकनेही गोल करत भारताच्या आघाडीवर थोडा दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र भारताने सामन्यावरील नियंत्रण सोडले नाही. दिलप्रीतने आपला तिसरा गोल करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. अखेरच्या क्षणी राजिंदर सिंहने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि भारताने सामना 8-2 असा जिंकला.

सलग तिसऱ्या विजयाने भारत मजबूत स्थितीत

या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. सुरुवातीच्या सामन्यात भारताने इंडोनेशियाचा 13-1 असा, तर श्रीलंकेचा 16-1 असा पराभव केला होता. आता कोरियाविरुद्ध 8-2 असा विजय मिळवत भारताने आपली विजयी मालिका कायम ठेवली आहे.

भारताचा पुढील सामना शनिवारी यजमान जपानविरुद्ध होणार आहे. या सामन्यातही भारताच्या आक्रमक खेळावर सर्वांचे लक्ष असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Jobs: आठवी, दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी! 12 हजार तरुणांना रोजगाराचे लक्ष्य; सरकार उभारणार 25 कौशल्य केंद्रे

Labh Drishti Yog 2026: गुरु-शुक्राच्या दुर्लभ संयोगाचा मोठा चमत्कार! आजपासून 5 राशींच्या आयुष्यात सोन्याचे दिवस, बँक बॅलन्स वाढणार

IND vs PAK: आज भारत-पाकिस्तानमध्ये रंगणार महामुकाबला! दुपारी 3 वाजता सामना, मोबाईलवर मोफत LIVE कुठे पाहता येणार?

Goa Dairy Workers: थकीत 'डीए'सह मागण्या मान्य करा, गोवा डेअरी कर्मचाऱ्यांचे 'घोषणाबाजी आंदोलन'

खरी कुजबुज: सरकारची कृपादृष्‍टी

SCROLL FOR NEXT