Suchika Tariyal Bronze Medal Asian Games MMA Dainik Gomantak
क्रीडा

Asian Games 2026: एशियन गेम्समध्ये भारताचा धमाका! नेमबाजांची एकाच दिवशी पदकांची बरसात; सुचिका तरियालने रचला नवा इतिहास

Suchika Tariyal Bronze Medal Asian Games MMA: एशियन गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला.

Manish Jadhav

Suchika Tariyal Bronze Medal Asian Games MMA: एशियन गेम्सच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी करत देशाचा गौरव वाढवला. पहिल्या दिवशी दोन रौप्यपदके जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशीही भारतीय ॲथलीट्सचा विजय रथ वेगाने पुढे जात आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताने आपले वर्चस्व सिद्ध करत दुहेरी पदक जिंकले.

अंतिम फेरीत हिमांशू ढिल्लों याने 252.4 गुणांची चमकदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले, तर भारताचाच (India) रुद्राक्ष बाळासाहेब पाटील याने 230.9 गुणांसह कांस्यपदकावर आपले नाव कोरले. चीनच्या शेंग लिहाओ याने 254.1 गुण मिळवत या प्रकारात सुवर्णपदक मिळवले. भारतीय नेमबाजांनी अतिशय संयमी आणि अचूक निशाणा साधत भारताची मान अभिमानाने उंच केली.

याशिवाय भारताची महिला मिक्स मार्शल आर्ट्स खेळाडू सुचिका तरियाल हिने इतिहास रचत भारतासाठी एक सुवर्ण क्षण निर्माण केला. महिलांच्या ६० किलो पारंपरिक मिक्स मार्शल आर्ट्स प्रकारात सुचिकाने कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीत तिला सिंगापूरच्या तेओ हुई हून हिने 2-0 ने पराभूत केले, ज्यामुळे सुचिकाचे सुवर्णपदकाचे स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, एशियन गेम्सच्या इतिहासात मिक्स मार्शल आर्ट्समध्ये पदक जिंकणारी सुचिका पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीचे संपूर्ण देशभरातून कौतुक केले जात आहे.

दुसरीकडे, नेमबाजीत भारताच्या पुरुष संघानेही आपला दबदबा कायम ठेवला आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रुद्राक्ष पाटील, पार्थ माणे आणि हिमांशू ढिल्लों यांच्या त्रिकुटाने 1890.1 गुणांसह रौप्यपदक मिळवले. या प्रकारात चीन, भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली, परंतु भारतीय त्रिकुटाने आपल्या आक्रमक आणि अचूक खेळाच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला. दुसऱ्या दिवशी मिळालेल्या या सर्व पदकांमुळे भारताच्या एकूण पदक संख्येत मोठी वाढ झाली असून भारतीय खेळाडूंची पदकांची भूक अधिकच वाढली. आगामी दिवसांत महिला आणि पुरुष क्रिकेट संघाकडूनही सुवर्णपदकाची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT