आशियाई खेळ 2022 (Asian Games 2022), जे चीनच्या (Chaina) हांगझोऊ शहरात खेळले जाणार होते, ते पुढे ढकलण्यात आले आहेत. आशियाई खेळाच्या विलंबाचे कोणतेही कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु चीनच्या राज्य माध्यमांच्या वृत्तानुसार, नवीनतम कोविड-19 (Covid-19) उद्रेकामुळे घडले आहे हे मात्र आपण स्पष्ट पणे म्हणू शकतो. (The Asian Games 2022 has been postponed due to the increasing prevalence of corona)
आशियाई क्रीडा स्पर्धेची 19 वी आवृत्ती हांगझोऊ येथे 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत खेळली जाणार होती. हांगझोऊ शांघायच्या जवळचे शहर आहे जे अनेक आठवड्यांपासून लॉकडाऊनमध्येच आहे. शहरातील 25 दशलक्ष रहिवाशांना घरीच राहण्याचे आदेश देऊन शहरातील मोठ मोठ्या भागात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
चीनी मीडियातील वृत्तानुसार, आशियाच्या ऑलिम्पिक परिषदेने घोषित केले होते की, 19 व्या आशियाई खेळ, मूळत: 10 ते 25 सप्टेंबर दरम्यान हांगझोऊ येथे खेळला जाणार आहे, ते पुढे ढकलले जातील आणि लवकरच नवीन तारीख जाहीर केली जाणार आहे. क्रीडा स्पर्धेच्या नवीन तारखा “नंतरच्या तारखेला जाहीर केल्या जातील”, असे निवेदनात म्हटले गेले आहे. चीनने यापूर्वी 2010 मध्ये ग्वांगझू येथे आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ओसीएने असेही म्हटले आहे की आशियाई युवा खेळ शान्तू 2021, जे यापूर्वी पुढे ढकलले गेले होते, ते आता रद्द केले जातील. “या व्यतिरिक्त, OCA EB ने चीनमधील शान्ताउ येथे या वर्षी 20-28 डिसेंबर रोजी नियोजित झालेल्या 3र्या आशियाई युवा खेळांच्या परिस्थितीचा देखील अभ्यास केला आहे. COC आणि आयोजन समितीशी चर्चा केल्यानंतर, OCA EB ने निर्णय घेतला की आशियाई युवा खेळ पुढे ढकलण्यात आल्याने, आशियाई युवा खेळ शांटौ 2021 रद्द केले जातील. त्यामुळे पुढील आशियाई युवा खेळ 2025 मध्ये ताश्कंद, उझबेकिस्तान येथे खेळले जाणार आहेत.
“तयारीच्या टप्प्यात उत्तम काम केल्याबद्दल ओसीए शान्तू आयोजन समितीचे आभार मानते आहे. आमचा ठाम विश्वास आहे की हा प्रयत्न शहराच्या विकासाच्या विविध पैलूंसाठी, विशेषत: क्रीडा क्षेत्रात तसेच आशियातील ऑलिम्पिक भावना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे," असे निवेदनात म्हटले गेले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.