India vs Pakistan | Asia Cup Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup Live Streaming: सुरु होतोय आशिया कपचा रोमांच! कधी आणि कुठे पाहू शकाल लाईव्ह सामने?

Asia Cup Live Streaming: आशिया कप स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होत असून कधी आणि कुठे हे सामने लाईव्ह पाहाता येणार, जाणून घ्या.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Live Streaming details:

आशिया चषक 2023 स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. वनडे स्वरुपात होणाऱ्या या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार आहेत. यातील 4 सामने पाकिस्तानमध्ये आणि 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेचा पाकिस्तान मुख्य प्रायोजक आहे. पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि नेपाळ संघात होणार आहे. हा सामना पाकिस्तामध्ये मुलतानला खेळवला जाणार आहे. तसेच अंतिम सामना कोलंबोला 17 सप्टेंबरला खेळवला जाईल.

या स्पर्धेतील सामने पाकिस्तानमधील मुलतान क्रिकेट स्टेडियम आणि लाहोर येथील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तसेच श्रीलंकेतील कँडी येथील पाल्लेकेले इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियवर होणार आहेत.

स्पर्धेची गटवारी

आशिया चषकात 6 संघ सहभागी होणार आहेत. आशिया चषकात भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ हे सहा संघ सहभागी होणार आहेत. या सहा संघांची सुपर सिक्स फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे.

ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघांचा समावेश आहे, तर बी ग्रुपमध्ये गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

स्पर्धेचे स्वरुप

या स्पर्धेत आधी साखळी फेरी खेळवली जाणार आहे. यात प्रत्येक संघ आपापल्या गटातील संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळले. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोर फेरीत प्रवेश करतील.

सुपर फोर फेरीत देखील चार संघ एकमेकांविरुद्ध साखळी पद्धतीने सामने खेळवले जातील, यातून गुणतालिकेतील अव्वल दोन संघ 17 सप्टेंबर दरम्यान अंतिम सामना खेळणार आहेत.

वेळ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग

या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरु होणार आहेत. या स्पर्धेतील सामने चाहत्यांना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सच्या विविध चॅनेलवर विविध भाषांमध्ये पाहाता येणार आहेत.

याशिवाय डिज्नी + हॉटस्टार या ऍप आणि वेबसाईटवर मोफत सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT