India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

IND vs PAK: राखीव दिवशीही पावसाचा खोडा, पाकिस्तानविरुद्ध सामना पुन्हा रद्द झाला, तर काय होणार?

Asia Cup 2023: भारत आणि पाकिस्तान संघाचा आशिया चषकातील सुपर फोरचा सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे, पण त्यावरही पावसाचे सावट आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Super Four India vs Pakistan Reserve Day Rain Update:

भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक २०२३ स्पर्धेचा सुपर फोरचा सामना रविवारी सुरु झाला आहे. मात्र, कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्याने हा सामना रोखीव दिवशी म्हणजेच सोमवारी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

रविवारी भारताविरुद्ध पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला. पण पावसामुळे सामना थांबला तेव्हा भारताने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या.

त्यानंतर पावसामुळे रविवारी सामना पुढे चालू होऊ शकला नाही. त्यामुळे आता उर्वरित सामना सोमवारी खेळवला जाणार आहे.

मात्र सोमवारीही कोलंबोमध्ये पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत म्हणजे दुपारी ३ वाजता सामना सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे आता चाहत्यांना प्रश्न पडला आहे की सोमवारीही रविवारप्रमाणेच सामना पूर्ण झाला नाही, तर काय होणार?

दरम्यान, सोमवारी 24.1 षटानंतर पुढे खेळ सुरू होणार असून पूर्ण 50-50 षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

मात्र सोमवारीही जर पावसाचा व्यत्यय आला, तर मात्र षटकांची संख्या कमी करून किंवा डकवर्थ लुईस नियमाचा वापर करून सामन्याचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, जर सोमवारीही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर सामना रद्द ठरवण्यात येईल.

जर सामना रद्द झाला तर...

जर सामना रद्द झाला तर भारत आणि पाकिस्तान संघाला प्रत्येकी 1 गुण दिला जाणार आहे. जर असे झाले, तर पाकिस्तान 3 गुणांसह गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर येईल. कारण पाकिस्तानने सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला पराभूत करत 2 गुण मिळवले आहेत.

तसेच सध्याच्या गुणतालिकेनुसार श्रीलंकेनेही बांगलादेशला पराभूत केल्याने त्यांचेही 1 गुण आहेत. अशात जर हा सामना रद्द झाला तर भारताला अंतिम फेरीत जाण्यासाठी 12 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध आणि 15 सप्टेंबर रोजी बांगलादेशविरुद्ध होणारा सामना जिंकावाच लागणार आहे.

जर भारताला एका जरी सामन्यात पराभव स्विकारावा लागला किंवा सामना पावसामुळे रद्द झाला, तर मात्र अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे.

साखळी फेरीतही सामना रद्द

आशिया चषकाच्या साखळी फेरीतही भारत आणि पाकिस्तान हे संघ आमने-सामने आले होते. मात्र तो सामना भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केल्यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता. पण रद्द होण्यापूर्वी भारताने 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT