Team India Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 पाकिस्तानात होणार नाही? 'या' देशांनी BCCI ला दिला पाठिंबा

Asia Cup 2023: आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिसकावून घेतल्यास पाकिस्तान ही स्पर्धा अजिबात खेळणार नाही, अशी बातमी अलीकडेच आली होती.

Manish Jadhav

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या यजमानपदाचा घोळ अजूनही तसाच आहे, जिथे एकीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या स्पर्धेचे यजमानपद गमावायचे नाही, तर भारतीय क्रिकेट बोर्डही आपले खेळाडू पाकिस्तान दौऱ्यावर पाठवायला तयार नाही. अशा स्थितीत बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यातील वादावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

दरम्यान, या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडून हिरावून घेतल्यास पाकिस्तान ही स्पर्धा अजिबात खेळणार नाही, अशी बातमी अलीकडेच आली होती.

यातच, आता एक मोठी बातमी समोर येत आहे की, बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी आशिया कपच्या यजमानपदासाठी भारताशी संगनमत केले आहे.

या दोन्ही बोर्डांनी आशिया चषक 2023 च्या यदमानपदापासून पाकिस्तानला दूर ठेवण्यासाठी हे संगनमत केले आहे. मात्र, आता ही बातमी समोर आल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे.

श्रीलंका आणि बांगलादेश एकत्र आले:-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंका आणि बांगलादेश देखील आशिया कप 2023 च्या यजमानपदापासून पाकिस्तानला दूर ठेवण्यास उत्सुक आहेत.

आशिया चषक पाकिस्तानच्या (Pakistan) बाहेर तटस्थ ठिकाणी आयोजित करावा, असे बीसीसीआयने आधीच सांगितले आहे. आता श्रीलंका आणि बांगलादेशही एकत्र आल्याने पाकिस्तानकडून यजमानपद हिसकावण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.

अशा परिस्थितीत, आता पुन्हा एकदा आशिया चषक यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता आहे, जिथे 2022 मध्ये आशिया कप आयोजित करण्यात आला होता.

दुसरीकडे, या वर्षी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक देखील भारतात होणार आहे, ज्याचे आयोजन भारत करत आहे.

विशेष म्हणजे, आतापासून बीसीसीआय त्याचे संपूर्ण वेळापत्रक करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, अशा बातम्याही येत आहेत की, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीला बीसीसीआयने लेखी आश्वासन द्यावे, असे वाटते की, यानंतर 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होईल, ज्यामध्ये टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येईल. मात्र बीसीसीआयकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT