Pakistan vs Nepal Dainik Gomantak
क्रीडा

PAK vs NEP: 'हेल्मेट न घालणंच चूकलं!' रिझवानच्या रनआऊटवर अश्विनची प्रतिक्रिया

Asia Cup 2023: पराभूत होऊनही नेपाळच्या फिल्डिंगने जिंकली मनं, पाकिस्तानच्या दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Pranali Kodre

Asia Cup 2023 Pakistan vs Nepal Imam-ul-Haq and mohammad rizwan run out:

स्पर्धेला बुधवारी पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यातील सामन्याने सुरुवात झाली. मुलतानला झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने 238 धावांची विजय मिळवला, पण असे असले तरी नेपाळच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक अनेकांनी केले.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नेपाळ प्रथम गोलंदाजीसाठी उतरले. त्यांनी सुरुवातीलाच पाकिस्तानला मोठे धक्के दिले. 25 धावातच फखर जमान आणि इमाम-उल-हक या दोघांच्या विकेट्स घेतल्या होत्या.

फखरला करन केसीने बाद केले. तसेच इमाम मात्र नेपाळचा कर्णधार रोहित पौडवालने केलेल्या अप्रतिम थ्रोवर धावबाद झाला. त्यानंतर पाकिस्तानचा डाव कर्णधार बाबर आझमने मोहम्मद रिझवानला साथीला घेत सावरला होता. मात्र रिझवानही विचित्रपद्धतीने धावबाद झाला. यावर भारताचा फिरकीपटू आर अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे.

रोहितच्या थ्रोवर इमाम धावबाद

नेपाळकडून सातव्या षटकात सोमपाल कामी गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर इमामने मिड ऑफच्या दिशेने शॉट मारत एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या 20 वर्षीय रोहितने चेंडू चपळाईने स्टंपच्या दिशेने फेकला. यावेळी इमाम क्रीजमध्ये पोहचण्याआधीच चेंडू थेट स्टंपवर जाऊन आदळला. त्यामुळे इमामला 5 धावांवर माघारी परतावे लागले.

विचित्र पद्धतीने बाद झाला रिझवान

नेपाळकडून 24 व्या षटकात संदीप लामिछाने गोलंदाजी करत होता. त्याने टाकलेल्या चौथ्या चेंडूवर रिझवानने कव्हरला शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला. पण दिपेंद्र सिंगने चपळाईने नॉन स्ट्रायकरला चेंडू फेकला.

यावेळी तो चेंडू थेट स्टंपवर आदळला. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जर रिझवानने डाईव्ह मारली असती, तर तो धावबाद होण्यापासून वाचू शकला असता. मात्र, त्याला चेंडू लागेल असे वाटून त्याने त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच प्रयत्नात तो धावबाद झाला.

त्याच्या या धावबादवर अश्विनने प्रतिक्रिया देताना सोशल मीडियावर पोस्ट केली की, 'थ्रोच्या उंचीमुळे रिझवानला वाचणे कठीण झाले होते. पण कोणताही खेळाडू साधारणत: धावत असताना प्रत्येकवेळी डाईव्ह मारतो.'

'त्याने डाईव्ह न मारणे ही दुर्मिळ गोष्ट आहे. याचे एकमेव कारण म्हणजे त्याने हेल्मेट न घालणे. त्याला फिरकी गोलंदाजीविरुद्ध स्वीप करणे आवडते आणि हेल्मेटशिवाय ही गोष्ट आणखीच विचित्र दिसते.

दरम्यान, रिझवान 44 धावांवर बाद झाला. त्याने आझमबरोबर 86 धावांची भागीदारी केली.

बाबर आणि इफ्तिखान यांचे शतके

रिझवान बाद झाल्यानंतर इफ्तिखार अहमद याने बाबरला चांगली साथ दिली. त्यांनी 214 धावांची भागीदारी केली. बाबर अखेरच्या षटकात दीड शतकी खेळी करून बाद झाला. त्याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली.

तसेच इफ्तिखार अहमदने 71 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने 50 षटकात 6 बाद 342 धावा उभारल्या आणि नेपाळसमोर 343 धावांचे आव्हान ठेवले.

नेपाळकडून सोमपाल कोमी याने 2 विकेट्स घेतल्या. तसेच करन केसी आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

नेपाळला 343 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 23.4 षटकात सर्वबाद 104 धावाच करता आल्या. नेपाळकडून अरिफ शेख (26), सोमपाल कामी (28) आणि गुलसान झा (13) यांनाच दुहेरी धावसंख्या पार करता आली.

शादाब खानने 4 विकेट्स घेतल्या. तसेच शाहीन आफ्रिदी आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. याशिवाय नसिम शाह आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: कशाला घाई केली मित्रा...! Shubman Gill चा स्वतःच्या पायावर धोंडा, भडकला गौतम गंभीर; टीम इंडिया अडचणीत

Goa Assembly: आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेवरुन आलेमाव बरसले, 'सत्तरी' पॅटर्नवर उपस्थित केले सवाल; वाचा दिवसभरातील घडामोडी

IND vs ENG: इंग्लंडमध्ये केएल राहुलचा जलवा, करिअरमध्ये पहिल्यांदाच नोंदवले 'हे' 3 मोठे रेकॉर्ड; लवकरच गावस्करांनाही सोडणार मागे!

महात्मा गांधी म्हणाले होते 'दारु सोडा', अवैध मद्य तस्करीवरुन विजय सरदेसाईंनी दिले PM मोदींच्या गुजरातचे उदाहरण

Viral Video: आजीबाईचा 'स्वॅग'च निराळा! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT