PAK vs NEP: बाबर - इफ्तिखारच्या शतकांनी सावरली पाकिस्तानची नौका, विराट-रहाणेच्या विक्रमालाही धक्का

Asia Cup 2023: नेपाळविरुद्ध पाकिस्तानकडून बाबर आझम आणि इफ्तिखार अहमदने शतके करत विराट-रहाणेचा विक्रम मोडला आहे.
Babar Azam and Iftikhar Ahmed
Babar Azam and Iftikhar AhmedDainik Gomatak

Asia Cup 2023 Pakistan vs Nepal: Babar Azam and Iftikhar Ahmed Double Hundred Partnership:

आशिया चषक 2023 स्पर्धेत बुधवारी पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ यांच्यात खेळला गेला. मुलतानला होत असलेल्या या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी शतके झळकावली. त्यांच्या शतकाने विक्रमही नोंदवले गेले आहेत.

या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेत नेपाळला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले. मात्र नेपाळने सुरुवातीलाच शानदार क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. नेपाळने फखर जमान आणि इमाम-उल-हकला स्वस्तात बाद करत पाकिस्तानला मोठे धक्के दिले. पाकिस्तानने २५ धावातच ५ विकेट्स गमावल्या होत्या.

मात्र, त्यानंतर कर्णधार बाबर आझमने जबाबदारी खांद्यावर घेतली. त्याने आधी मोहम्मद रिझवानला साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. पण रिझवान ४४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ आघा सलमानही ५ धावांवर माघारी परतला. परंतु यानंतर इफ्तिखार अहमदने बाबरला दमदार साथ दिली.

Babar Azam and Iftikhar Ahmed
Asia Cup 2023 च्या पहिल्याच दिवशी बांगलादेशला मोठा धक्का! स्टार विकेटकीपर अचानक स्पर्धेतून बाहेर

या दोघांनीही दोन्ही बाजूंनी फटकेबाजी करताना शतके साजरे केले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १३१ चेंडूत २१४ धावांची भागीदारी रचली. त्यांची ही भागीदारी विक्रमीही ठरली आहे.

आशिया चषक स्पर्धेत कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी करणाऱ्या जोड्यांच्या यादीत बाबर आणि इफ्तिखार यांनी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला मागे टाकले आणि तिसरा क्रमांक मिळवला आहे.

विराट आणि रहाणे यांनी २०१४ आशिया चषकात बांगलादेशविरुद्ध २१३ धावांची भागीदारी रचली होती. या यादीत अव्वल क्रमांकावर मोहम्मद हाफिज आणि नासिर जमशेद आहेत. त्यांनी मीरपूरला २०१२ साली भारताविरुद्ध २२४ धावांची भागीदारी केली होती.

तसेच दुसऱ्या क्रमांकावर शोएब मलिक आणि युनूस खान असून त्यांनी २००४ साली हाँग काँग विरुद्ध २२३ धावांची भागीदारी केली होती.

Babar Azam and Iftikhar Ahmed
Asia Cup Live Streaming: सुरु होतोय आशिया कपचा रोमांच! कधी आणि कुठे पाहू शकला लाईव्ह सामने?

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाले, तर बाबर आझम अखेरच्या षटकात बाद झाला. त्याने 131 चेंडूत 151 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १४ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच इफ्तिखार अहमदने 71 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी केली. त्यामुळे पाकिस्तानने ५० षटकात ६ बाद ३४२ धावा उभारल्या आणि नेपाळसमोर ३४३ धावांचे आव्हान ठेवले.

नेपाळकडून सोमपाल कोमी याने २ विकेट्स घेतल्या. तसेच करन केसी आणि संदीप लामिछाने यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

बाबर आझमचाही विक्रम

बाबर आझम कर्णधार म्हणून पाकिस्तानकडून वनडेत दोनदा दीडशतकी खेळी करणारा पहिला आणि एकमेव खेळाडू ठरला आहे. त्याने यापूर्वी २०२१ साली इग्लंडविरुद्ध एजबस्टनलाही १५८ धावांची खेळी केली होती. त्यावेळीही तो पाकिस्तानचा कर्णधार होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com