India vs Pakistan | Asia Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: एकदाचं ठरलं! पाकिस्तानातच होणार आशिया चषक; टीम इंडियाही खेळणार, पण...

आशिया चषक 2023 स्पर्धा पाकिस्तानच आयोजित करणार असल्याचे समोर आले असून भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ या स्पर्धेसाठी एकाच गटात आहेत.

Pranali Kodre

Asia Cup 2023 in Pakistan: आशिया चषक 2023 स्पर्धेच्या ठिकाणावरून गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

पण भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानला सुरक्षेच्या कारणाने जाणार नसल्याचे यापूर्वीच बीसीसीआयने स्पष्ट केले होते. त्यामुळे ही स्पर्धा कुठे खेळवली जावी याबद्दल प्रश्नचिन्ह होते.

पण आता अंतिम निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात एशियन क्रिकेट काऊंसिलची बैठक झाली आहे. या बैठकीदरम्यान काही महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली असल्याचे समजले आहे. तसेच आशिया चषकाच्या आयोजनाबद्दल सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्नही झाला.

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार आशिया चषक 2023 स्पर्धा पाकिस्तानातच खेळवली जाणार आहे, पण भारतीय संघाच्या सामन्यांसाठी पाकिस्तानबाहेरील एका ठिकाणाची निवड करण्यात येईल.

दरम्यान, पाकिस्तानबाहेरील ठिकाण कोणते असेल, याबद्दल अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. तरी, यासाठी युएई, ओमान, श्रीलंका आणि इंग्लंड असे काही पर्याय समोर आहेत. तरी अनेक मुद्यांचा विचार करता या ठिकाणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्रवास, परिस्थितीत, हवामान या गोष्टींचा विचार केला दाणार आहे.

कारण आशिया चषक जुलै-सप्टेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला युएईमधील तापमान साधारणत: 40 डिग्री सेल्सियसदरम्यान असते. पण या तापमानातही तिथे सामने होतात. 2021 आयपीएलचे सामने सप्टेंबरमध्ये युएईत झाले होते.

तसेच मस्कत, ओमानमध्ये तुलनेने कमी तापमान असते. याठिकाणी २०२१ टी२० वर्ल्डकपची पहिली फेरी झाली होती. याशिवाय इंग्लंडसुद्धा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आता याबद्दल कसा निर्णय घेतला जाणार हे पाहावे लागणार आहे.

दरम्यान, आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटात आहेत. त्यांच्यासह पात्रता फेरीतून पात्र ठरलेला संघ खेळेल, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत.

आशिया चषकात या सहा संघांमध्ये दोन गटांमध्ये सुपर सिक्सची फेरी खेळवली जाईल, त्यातून प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ पुढील फेरीत प्रवेश करतील. सुपर फोर फेरीत चार संघात साखळी फेरी खेळवली जाईल, यातून अव्वल दोन संघ अंतिम सामना खेळणार आहेत. म्हणजेच एकूण 13 सामने 13 दिवसांच्या कालावधीत खेळवण्यात येणार आहेत.

दरम्यान, या स्पर्धेची संरचना पाहाता भारत आणि पाकिस्तान हे चांगला खेळ करत पुढे जात राहिले, तर एकून तीनवेळा आमने-सामने येऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT