Mohammad Siraj
Mohammad Siraj  Dainik Gomantak
क्रीडा

W,0,W,W,4,W...! सिराजच्या वेगाने लंकेची दाणादाण, भारतीय क्रिकेट इतिहासात कोरलं सुवर्णाक्षरांनी नाव

Pranali Kodre

Asia Cup 2023 India vs Sri Lanka Final Mohammed Siraj Record:

आशिया चषक 2023 स्पर्धेत रविवारी (17 सप्टेंबर) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात अंतिम सामना होत आहे. आर प्रेमदासा स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्यात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची दाणादाण उडाली आहे.

या सामन्यात श्रीलंकेकडून पाथम निसंका आणि कुशल परेरा सलामीला फलंदाजीला आले होते. पहिल्याच षटकात परेराला जसप्रीत बुमराहने बाद केले. तो शुन्यावर बाद झाला. त्यानंतर मात्र, मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांना टिकून खेळणे कठीण झाले.

सिराजने डावाच्या चौथ्या षटकात पाथम निसंका, सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका आणि धनंजय डी सिल्वा या चार श्रीलंकन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

सिराजने चौथ्या षटकात निसंकाला पहिल्या चेंडूवर, समरविक्रमाला तिसऱ्या चेंडूवर असलंकाला चौथ्या चेंडूवर आणि धनंजय डी सिल्वाने सहाव्या चेंडूवर बाद केले. दरम्यान याच षटकात पाचव्या चेंडूवर चौकार गेला होता.

त्यामुळे श्रीलंकेची आवस्था पहिल्या 5 षटकांमध्ये 5 बाद 12 धावा अशी बिकट झाली होती. दरम्यान सिराजच्या नावावर मोठा विक्रम झाला आहे.

सिराज हा वनडे क्रिकेटमध्ये एकाच षटकात चार विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी कोणालाही असा विक्रम करता आला नव्हता.

या सामन्यात सिराजने डावातील दुसऱ्या षटकातही गोलंदाजी केली होती, ज्यात एकही धाव त्याने दिली नव्हती. तसेच त्यानंतर चौथ्या षटकात त्याने 4 विकेट्स घेतल्याने 5 व्या षटकापर्यंत त्याची आकडेवारी 4 धावात 4 विकेट्स अशी होती.

श्रीलंकेच्या पहिल्या 5 विकेट्सपैकी धनंजय डी सिल्वा आणि पाथम निसंका यांनाच भोपळा फोडता आला. डी सिल्वाने 4 धावा केल्या, तर निसंका 2 धावांवर बाद झाला. अन्य तिन्ही फलंदाज शुन्यावर बाद झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT