Najmul Hossain Shanto & Mehidy Hasan Miraz Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2023: मिराज-शांतोने ठोकले, तर गोलंदाजांनी रोखले, बांगलादेशचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

BAN vs AFG: आशिया चषकात बांगलादेशने अफगाणिस्तानवर विजय मिळवत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Pranali Kodre

Asia Cup 2023 Bangladesh won by 89 runs by Afghanistan:

आशिया चषक २०२३ स्पर्धेतील ब गटातील बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामना रविवारी पार पडला. लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बांगलादेशने ८९ धावांनी विजय मिळवला. याबरोबरच या स्पर्धेतील आव्हानही कायम ठेवले आहे.

या स्पर्धेत बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर ३३५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा डाव ४४.३ षटकात २४५ धावांवरच संपुष्टात आला.

अफगाणिस्तानने ३३५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्याच षटकात रेहमनुल्लाह गुरबाजची विकेट गमावली होती. मात्र, त्यानंतर इब्राहिम झाद्रान आणि रेहमत शाह यांनी डाव सावरत ७८ धावांची भागीदारी केली.

मात्र, त्यांची भागीदारी तस्किन अहमदने रेहमतला ३३ धावांवर बाद करत तोडली. त्यानंतर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने झाद्रानची चांगली साथ दिली. मात्र झाद्रान ७५ धावांवर असताना २८ व्या षचकात हसन महमुदच्या गोलंदाजीवर मुशफिकूर रहिमकडे झेल देत बाद झाला.

त्यानंतर नजिबुल्लाह झाद्रानने शाहिदीला साथ दिली. शाहिदीने अर्धशतक करत अफगाणिस्तानची आशा कायम ठेवली होती. मात्र, नजिबुल्लाह आणि शाहिदी लागोपाठच्या षटकात बाद झाले. नजिबुल्लाहने १७ धावा केल्या, तर शाहिदीने ५१ धावा केल्या.

त्यानंतर मात्र, अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी झटपट विरकेट गमावल्या. तरी राशिद खानने अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण तो १५ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याची विकेट अफगाणिस्तानच्या डावातील अखेरची विकेट ठरली.

बांगलादेशकडून तस्किन अहमदे ४ विकेट्स घेतल्या. तसेच शोरिफूल इस्लामने ३ विकेट्स घेतल्या. तसेच हसन महमुद आणि अफिफ हुसेन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशकडून मोहम्मद नईम आणि मेहदी हसन मिराज यांनी ६० धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात मिळवून दिली होती. पण नईमने २८ धावांवर विकेट गमावली.

त्यानंतर तोहिद हृदोयही लगेचच शुन्यावर बाद झाले. पण यानंतर मिराजला नजमुल हुसैन शांतोने भक्कम साथ दिली. या दोघांनीही शतकी खेळीही केल्या. पण शांतो शतक केल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्ना धावबाद झाला. त्याने १०५ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह १०४ धावांची खेळी केली.

तसेच मिराज मात्र रिटायर्ल हर्ट होऊन बाहेर गेला. मिराजने ११९ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. या दोघांनंतर मुशफिकूर रहिमने २५ धावांची आणि कर्णधार शाकिब अल हसनने ३२ धावांची छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ५ विकेट्स गमावत ३३४ धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमान आणि गुलबादिन नाईम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बांगलादेशच्या बाकी ३ विकेट्स धावबादच्या रुपात गेल्या.

आता अफगाणिस्तानला श्रीलंकेविरुद्ध ५ सप्टेंबर रोजी साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळायचा आहे. यानंतर ब गटातील अव्वल दोन संघ निश्चित होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

Non-Veg Milk: 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणजे काय? भारत-अमेरिका वादाचं कारण बनलेलं काय आहे हे दूध?

SCROLL FOR NEXT