Bangladesh Team Dainik Gomantak
क्रीडा

Bangladesh संघाला मिळाली 'श्रीरामाची' साथ; आशिया चषकापूर्वी नवी रणनिती

Asia Cup 2022: बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी मात्र श्रीराम यांना राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनवल्याच्या वृत्ताचे खंडन केले.

दैनिक गोमन्तक

Asia Cup 2022: बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) यांची ऑस्ट्रेलियात यंदाच्या वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापर्यंत राष्ट्रीय संघाचे टेक्निकल सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. बीसीबीचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी मात्र श्रीराम यांना राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक बनवल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

विश्वचषकापर्यंत तुमच्यासोबत असेल

हसन यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "आम्ही श्रीराम यांचे नाव निश्चित केले आहे. ते 21 ऑगस्ट रोजी इथे येतील. टेक्निकल सल्लागार म्हणून ते येत आहेत. इथे ते टी-20 वर्ल्ड कपपर्यंत सेवा देतील. ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान टी-20 वर्ल्ड कपचे (T-20 World Cup) आयोजन करण्यात येणार आहे.''

ऑस्ट्रेलियन संघालाही कोचिंग दिले

श्रीराम यांनी ऑस्ट्रेलियाचे माजी प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्या नेतृत्वाखाली काम केले आहे. 2016 मध्ये त्यांच्याकडे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमधील (Royal Challengers Bangalore) आपल्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी अलीकडेच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेतील कामगिरीचे मूल्यांकन केल्यानंतर श्रीराम यांच्या दीर्घकालीन कार्यकाळाबद्दल निर्णय घेतला जाईल, असे हसन यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT