Asia Cup 2022 Final Dainik Gomantak
क्रीडा

Asia Cup 2022 Final: सोशल मीडियावर पाकिस्तानच्या पराभवाचे सेलिब्रेशन, मीम्सचा पडतोय पाउस

PAK vs SL: सोशल मीडियावर पाक संघाची खिल्ली उडवली जात आहे.

दैनिक गोमन्तक

तरुणांनी भरलेला श्रीलंका क्रिकेट संघ आशियाचा नवा चॅम्पियन बनला आहे. दुबई येथे रविवारी झालेल्या आशिया चषक 2022 च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला श्रीलंकेची अवस्था 58 धावांत 5 विकेट्स गमावून खराब झाली होती, परंतु भानुका राजपक्षे (71) आणि वानिंदू हसरंगा (36) यांनी आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले आणि त्यानंतर लंकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली.

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने निर्धारित 20 षटकांत 170 धावा केल्या. तर पाकिस्तानचा संघ 147 धावांवर ऑलआऊट झाला. आशिया चषकातून टीम इंडिया (Team India) बाहेर पडल्यानंतर या स्पर्धेतील पाकिस्तानला फेव्हरिट मानले जात होते.

मात्र आता पाकिस्तानच्या हातून ट्रॉफी हरवल्याने भारतीय चाहते सोशल मीडियावर (Social Media) खूप सेलिब्रेशन करत आहेत. पाकिस्तानच्या पराभवाची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी खेळाडू ट्रोलिंगही होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hospital Infrastructure: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेवरून 'आप' आक्रमक; आरोग्य सुविधा सुधारण्याची मागणी

Government Schemes: 'सरकार तुमच्या दारी'ला गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच दिवशी 5,960 नागरिकांचा सहभाग

Crime News: लग्नाचे प्रलोभन दाखवून लैंगिक अत्याचाराचा आरोप; पॉक्सो न्यायालयाकडून आरोपीवर आरोप निश्चित

CCP Election Case: सीसीपी निवडणूक वादात अधिकारक्षेत्राचा मुद्दा; जिल्हा न्यायालयाला नियम रद्द करता येत नसल्याचा दावा

Fake Voters Allegations: फातोर्ड्यात 50 हून अधिक बोगस मतदार? सरदेसाईंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT