Ashleigh Barty  Dainik Gomantak
क्रीडा

वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू एश्ले बार्टीने केली निवृत्तीची घोषणा, VIDEO

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारी महिला टेनिसपटू एश्ले बार्टीने (Ashleigh Barty) अचानक निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच चकित केले आहे.

दैनिक गोमन्तक

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारी स्टार महिला टेनिसपटू एश्ले बार्टीने अचानक निवृत्ती जाहीर करुन सर्वांनाच चकित केले आहे. याआधीही बार्टीने टेनिसमधून ब्रेक घेतला होता. बार्टीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांना आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. बार्टी (Ashleigh Barty) ही ऑस्ट्रेलियातील (Australia) महान खेळाडूंपैकी एक आहे. (Ashleigh Barty the world's top female tennis player has announced her retirement)

दरम्यान, 2022 च्या सुरुवातीला तिने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते. 44 वर्षांत हे विजेतेपद पटकावणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली आहे. बार्टीने आपल्या कारकिर्दीत तीन ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. व्हिडिओमध्ये बार्टी म्हणाली, ''मी खूप दिवसांपासून निवृत्तीचा विचार करत होते. माझ्या कारकिर्दीत असे अनेक अद्भुत क्षण आले जे खूप महत्त्वाचे होते. गेल्या वर्षी विम्बल्डनने (Wimbledon) एक खेळाडू म्हणून माझ्यात खूप बदल केला. ते माझे स्वप्न होते.''

तसेच, बार्टीने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "टेनिसमधून निवृत्तीची घोषणा करताना आजचा दिवस माझ्यासाठी खूप कठीण आणि भावनांनी भरलेला आहे. ही बातमी तुमच्यासोबत कशी शेअर करावी हे मला कळत नव्हते. म्हणून मी माझ्या जवळच्या मित्राकडे मदत मागितली. टेनिसने मला एक वेगळी ओळख दिली. या काळात मला ज्यांनी-ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानते.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT