Usman Khawaja  Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: पाच दिवस खेळला ख्वाजा, नावावर केला अनोखा रेकॉर्ड!

Ashes 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा पहिला सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे.

Manish Jadhav

Ashes 2023: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणारा पहिला सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उस्मान ख्वाजाने आपले अर्धशतक पूर्ण केले असून तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी धडपडताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या या स्टार फलंदाजाने एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर नोंदवला आहे.

उस्मान ख्वाजा हा कसोटी सामना पाच दिवस खेळणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला

दरम्यान, उस्मान ख्वाजा हा कसोटी सामना पाच दिवस खेळणारा दुसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियन फलंदाज किम ह्यूजने हा पराक्रम केला आहे. त्याचवेळी, जगात आतापर्यंत केवळ 12 खेळाडूंनी संपूर्ण पाच दिवस कसोटीत फलंदाजी केली आहे.

उस्मान हा या यादीतील 13 वा खेळाडू ठरला आहे. या यादीत भारताचे तीन, वेस्ट इंडिजचे तीन, इंग्लंडचे चार आणि दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे (Australia) प्रत्येकी एक खेळाडू आहे. भारताचे एमएल जयसिम्हा, रवी शास्त्री आणि चेतेश्वर पुजारा यांचा या एलिट यादीत समावेश आहे.

तसेच, ख्वाजाने पहिल्या डावात शानदार शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने 321 चेंडूत 14 चौकार-3 षटकार मारले आणि 43.93 च्या स्ट्राइक रेटने 141 धावा केल्या. त्याने दुसऱ्या डावात 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेट पडल्या

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने (England) 78 षटकात 8 गडी गमावून 393 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 386 धावा केल्या. इंग्लंडचा दुसरा डाव 273 धावांवर आटोपला.

यानंतर ऑस्ट्रेलियाला 281 धावांचे लक्ष्य मिळाले. सध्या ऑस्ट्रेलियाला 40 षटकात 5 गडी राखून 100 धावा करायच्या आहेत. या सामन्याचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT