Ashes 2023, ENG vs AUS Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये कुणाचं पारड जड? हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या

Ashes 2023, ENG vs AUS: ऍशेस ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी मालिका आहे, जी अजूनही खेळली जात आहे.

Manish Jadhav

Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 16 जून 2023 पासून ऍशेस मालिका सुरु होणार आहे. ऍशेस ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जुनी मालिका आहे, जी अजूनही खेळली जात आहे.

याची सुरुवात 1882-83 मध्ये झाली. 1882 मध्ये ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. या दोघांमधील मालिकेतील पहिला सामना ओव्हलच्या मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये इंग्लंडला (England) पराभवाचा सामना करावा लागला होता. दोघांमधील या ऐतिहासिक मालिकेपूर्वीचे आकडे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ENG vs AUS हेड टू हेड: कुणाचं पारड जड?

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 72 ऍशेस मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 34 वेळा विजय मिळवून आघाडी कायम राखली आहे. त्याचबरोबर, इंग्लंडने 32 वेळा मालिका जिंकली आहे.

याशिवाय 6 मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. याआधी 2021-22 मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0 ने विजय मिळवला होता. दोघांमध्ये आतापर्यंत एकूण 340 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियाने (Australia) 140 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 108 सामने जिंकले आहेत.

ऍशेस 2023 साठी दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (क), स्टीव्ह स्मिथ (व्हीसी), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅट रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.

इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (क), जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, मोईन अली, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रुट, जोश टॉंग, ख्रिस वोक्स , मार्क वुड.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT