Ben Stokes Dainik Gomantak
क्रीडा

Ashes 2023: ऑस्ट्रेलियन मीडियाने इंग्लंडला म्हटले 'CRYBABIES', मग कॅप्टन स्टोक्सनंही दिलं 'हे' उत्तर

Ben Stokes: ऍशेस 2023 मालिकेत फक्त इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्येच नाही, तर मीडियातची चढाओढ पाहायला मिळत आहे.

Pranali Kodre

Ben Stokes react on Australian media called Him Crybaby: ऍशेस मालिका म्हटलं की नेहमीच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघात विजयासाठी चढाओढ पाहायला मिळते. प्रत्येक सामन्यात विजयासाठी दोन्ही संघ जीवाने रान करताना दिसतात. त्यामुळे बऱ्याचदा काही वादामुळेच ही मालिका चर्चेत येते. असाच एक वाद नुकत्याच पार पडलेल्या लॉर्ड्स कसोटीत झाला.

ऍशेस 2023 मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 43 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोची दुसऱ्या डावातील विकेट वादग्रस्त ठरली. त्यावर सध्या दोन वेगवेगळी मते व्यत्त होत आहे. याचदरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन मीडियामध्येही युद्ध पेटल्याचे दिसत आहे.

बेअरस्टो चेंडू सोडल्यानंतर पुढे चालत गेल्याचे पाहून ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षकाने चेंडू स्टंपवर फेकत त्याला बाद केले होते. त्यामुळे इंग्लंड संघाने या विकेटवर नाराजी व्यक्त केली.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाची लॉर्ड्सवरील काही प्रेक्षकांकडून हुर्याही उडवण्यात आली. तसेच इंग्लिश मीडियानेही ऑस्ट्रेलिया संघावर यावरून ताशेरे ओढले. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियन मीडियानेही इंग्लंड संघावर निशाणा साधला. त्यांनी स्टोक्सचा चेहरा वापरून ग्राफिक्स छापले आहे. तसेच रडणारे बाळ (Crybabies) असे शीर्षक दिले आहे.

हे ग्राफिक्स पाहून स्टोक्सनेही उत्तर दिले आहे. 'मी नक्कीच हा नाही. मी कधी नवीन चेंडूने गोलंदाजी केली होती.'

दरम्यान, स्टोक्सने याआधी बेअरस्टोला ज्याप्रकारे बाद करण्यात आले, त्यावर सामना संपल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणला, 'मी या तथ्यावर चर्चा करणार नाही की तो बाद आहे की नाही, कारण तो बाद आहे, पण मला अशाप्रकारे सामना जिंकायचा आहे का? तर माझे उत्तर नाही असे असेल.'

ऑस्ट्रेलियाला ऍशेस जिंकण्याची संधी

ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन्ही कसोटीत विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ सध्या 5 कसोटी सामन्यांच्या या ऍशेस मालिकेत 2-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे आगामी तिन्ही कसोटीतील एकाही सामन्यात विजय मिळवला, तरी ऑस्ट्रेलिया यंदाच्या ऍशेस मालिकेत विजय निश्चित करेल.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात तिसरा ऍशेस सामना लीड्समधील हेडिंग्लेवर स्टेडियमवर होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT