Suraj and Achit  Dainik Gomantak
क्रीडा

आर्लेम स्पोर्टस क्लब लोलयेकर करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत

पोळे क्लबला नमविले; सूरज, अचित, ओमप्रकाशची चमक

दैनिक गोमन्तक

पणजी: सूरज डोंगरे व अचित शिगवण यांची चमकदार फलंदाजी, तसेच ओमप्रकाश चौहानच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर आर्लेम स्पोर्टस क्लबने 40व्या नंदा लोलयेकर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य लढतीत त्यांनी पोळे क्रिकेट क्लबवर 82 धावांनी सहज मात केली.

माशे क्रिकेट क्लबच्या स्पर्धेतील सामना रविवारी माशे-काणकोण येथील निराकार मैदानावर झाला. आर्लेम क्लबने प्रथम फलंदाजी करताना 13 षटकांत 1 बाद 94 धावा केल्या, पण नंतर पाच विकेट गमावल्यामुळे त्यांची घसरगुंडी उडाली. नंतर अचितने खिंड लढविल्यामुळे आर्लेम क्लबला 202 धावांची मजल मारता आली. उत्तरादाखल अतुल यादव याच्या अर्धशतकानंतरही पोळे क्लबचा डाव 120 धावांत संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक: आर्लेम स्पोर्टस क्लब: 34 षटकांत सर्वबाद 202 (सूरज डोंगरे 48, अचित शिगवण 47, शुभम गजिनकर 25, उदित यादव 3-27, राहुल गोसावी 2-38, रोहित नाईक 2-44) वि. वि. पोळे क्रिकेट क्लब: 26 षटकांत सर्वबाद 120 (अतुल यादव 53, प्रज्ञेश गावकर 14, राहुल गोसावी 14, ओमप्रकाश चौहान 3-14, अचित शिगवण 2-23, सोमेश प्रभुदेसाई 2-26).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dacoity Case Goa: तोंडावर मास्क, हातात शस्त्र, घरातल्यांना केली जीवघेणी मारहाण; बायणात सव्वाकोटींचा ऐवज घेऊन 8 दरोडेखोर पसार

New Rent Rules: भाडेकरु आणि घरमालकांसाठी 'नवीन रेंट करार नियम 2025' लागू, वाद मिटवण्यासाठी विशेष न्यायालये; वाचा काय आहेत नवे नियम?

Priyanka Chopra In Goa: उकडलेला भात, कॅरम आणि बीच वॉक; प्रियांकानं शेअर केले 'गोवा व्हेकेशन'चे PHOTO, पाहून तुम्हीही व्हाल 'Chill'

FDA Raids: एफडीएची धडक कारवाई! बागा, कळंगुट परिसरात 71 आस्थापनांची तपासणी, दंडात्मक कारवाईसह काजू युनिटला ठोकले टाळे

Viral Post: बंगळूरच्या तरुणाने दिला Cheat Code, गोव्यात टॅक्सी भाड्याचा दर कमी करणारं 'ते' एक वाक्य होतंय व्हायरल!

SCROLL FOR NEXT