Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण! गोव्याकडून खेळतो डोमेस्टिक क्रिकेट, पाहा कशी आहे कामगिरी

अर्जुन तेंडुलकरने आज मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

Pranali Kodre

Arjun Tendulkar Debut: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. या सामन्यातून मुंबईकडून अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले आहे.

अर्जुनला मुंबई इंडियन्सने 2021 मध्ये 20 लाखांच्या किमतीत खरेदी केले होते. तसेच नंतर 2022 आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने 30 लाखांची बोली लावत त्याला संघात घेत 2023 हंगामासाठीही कायम केले. मात्र 2021 आणि 2022 हंगामांमध्ये अर्जुनला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. अखेर आयपीएलच्या 16 व्या हंगामातून अर्जूनने पदार्पण केले आहे.

गोव्याकडून खेळतो देशांतर्गत क्रिकेट

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा असलेला अर्जुन सध्या देशांतर्गत क्रिकेट गोवा क्रिकेट संघाकडून खेळतो. त्याने गोव्याकडून पदार्पण करण्यापूर्वी विविध वयोगटातील देशांतर्गत स्पर्धांमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 15 जानेवारी 2021 रोजी मुंबईच्या वरिष्ठ संघाकडूनही पदार्पण केले होते. त्याने त्यावेळी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेतून मुंबईकडून हरियाणाविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला होता.

मात्र, नंतर मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून सातत्याने संधी मिळत नसल्याने त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे 2022-23 हंगामात त्याने गोव्याकडून प्रथम श्रेणी, लिस्ट ए आणि टी20 अशा तिन्ही प्रकारात पदार्पण केले.

त्याने गोव्याकडून 13 डिसेंबर 2022 रोजी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यापूर्वीच त्याचे लिस्ट ए आणि टी20 अशा दोन्ही प्रकारातही पदार्पण केले होते. त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण विक्रमी ठरले.

अर्जुनने गोव्याकडून राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच 207 चेंडूत 120 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 2 षटकार मारले.

याबरोबरच तो रणजी पदार्पणात शतक करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये सामील झाला. या यादीत त्याचे वडील सचिन देखील आहे. सचिनने 34 वर्षांपूर्वी 1988 साली मुंबईकडून गुजरातविरुद्ध रणजी पदार्पण करताना नाबाद 100 धावांची खेळी केली होती.

अर्जुनने आत्तापर्यंत 7 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 1 शतकासह 24.77 च्या सरासरीने 223 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 12 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने लिस्ट ए मधील 7 सामन्यातील 3 डावात फलंदाजी करताना 25 धावा केल्या आहेत, तर 8 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 9 टी20 सामन्यांमध्ये त्याने 5 डावात फलंदाजी केली असून 20 धावा केल्या आहेत आणि 12 विकेट्स घेतल्या आहेत.

अष्टपैलू क्रिकेटपटू

23 वर्षीय अर्जून हा प्रामुख्याने वेगवान गोलंदाज असून खालच्या फळीत फलंदाजी करण्याचीही त्याच्याकडे क्षमता आहे. तो डाव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bengaluru Airport Bomb Threat: "माझ्याकडे दोन बॉम्ब आहेत", बंगळुरु विमानतळावर हायव्होल्टेज ड्रामा; इंडिगो प्रवाशाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Chimbel Protest: चिंबलवासीयांचे महाआंदोलन! शेकडो ग्रामस्थ पोचले जुने गोवेत; अधिसूचना येईपर्यंत उपोषणाचा इशारा Video

Air Force Base Attack: विमानतळावर गोळीबार अन् स्फोटांचा आवाज! एअर बेसला दहशतवाद्यांनी बनवलं निशाणा; 20 ठार, 11 जणांना बेड्या VIDEO

Social Media Ban Goa: सोशल मीडिया वापरावर सरसकट बंदी अयोग्य! तवडकरांचे प्रतिपादन; अभ्यासावर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त

"कधी नारद, कधी चार्ली चॅप्लिन, कधी श्रीकृष्ण"! गोव्यातले बापलेक जपताहेत 800 वर्षांची परंपरा; भांड-बहुरूपी कला

SCROLL FOR NEXT