Sachin Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: 'अर्जुन तेंडुलकरला पुन्हा संधी मिळाली नाही तर', 'मास्टर ब्लास्टर म्हणाला...'

इंडियन प्रीमियर लीगच्या दोन हंगामात अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सच्या 28 सामन्यांमध्ये एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगच्या दोन हंगामात अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सच्या 28 सामन्यांमध्ये एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा स्थितीत सचिन तेंडुलकरने आपल्या मुलाबद्दल काय म्हटले असेल? हा एक प्रश्नच आहे.

दरम्यान, मास्टर ब्लास्टरने अर्जुनला स्पष्टपणे सांगितले आहे की, 'हा रस्ता तुझ्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यासाठी तुला कठोर परिश्रम घ्यावे लागेल.' मुंबई इंडियन्सशी निगडीत असलेल्या सचिननेही आपण निवडीच्या बाबतीत हस्तक्षेप करत नसल्याचे स्पष्ट केले. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) पाच वेळा आयपीएल चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सामील करुन घेतले, परंतु या लीगच्या दोन हंगामात त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

तसेच, तेंडुलकरला या वर्षी अर्जुन खेळला असता तर आवडेल असते का असे विचारले असता, सॅटइनसाइट शोमध्ये तो म्हणाला, “हा वेगळा प्रश्न आहे. मी काय विचार करत आहे किंवा मला काय वाटत आहे, याने काही फरक पडत नाही. मुंबई इंडियन्सचा हंगाम संपला आहे.

मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमुळे आशा निर्माण झाल्या होत्या

आयपीएल 2022 (IPL 2022) चा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी चांगला गेला नाही. गुणतालिकेत मुंबईत शेवटच्या स्थानावर आहे, जी त्यांची आयपीएल इतिहासातील सर्वात खराब कामगिरी आहे. मुंबई इंडियन्सला फक्त 4 सामने जिंकता आले. पहिल्या 8 सामन्यात मुंबईचा पराभव झाला होता. टिळक वर्मा, हृतिक शोकीन, डेवाल्ड ब्रेविस, रमणदीप सिंग यांच्यासह अनेक खेळाडूंना संघाने पदार्पणाची संधी दिली. संघाच्या खराब कामगिरीमुळे अर्जुनला संघात संधी मिळेल असे मानले जात होते, पण तसे झाले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Accident: मडगावात भीषण अपघात! कोकण रेल्वे स्टेशनजवळ दुचाकींच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू; आरोपी फरार

Amazon Layoffs: टेक विश्वात खळबळ! ॲमेझॉनने 14 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ, दोन टेक्स्ट मेसेज पाठवून केली सर्वात मोठी कर्मचारी कपात

Viral Video: आधी ट्रेनची काच लखलखीत, मग रुळावर 'ती' कृती... तरूणीचा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी गोंधळात

Dindi Utsav : 1909 साली गोव्यात पोर्तुगीज राजवट होती, लोटलीकर चाळीत मंदिराची स्थापना करण्यात आली; 'दिंडी उत्सवा'चे बदलते रुप

कुठ्ठाळीत स्थलांतरीतांना हवाय कन्नड आमदार?? कन्नड महासंघाची मंत्री मॉविन गुदिन्हो यांच्याकडे मागणी

SCROLL FOR NEXT