Arjun Tendulkar Dainik Gomantak
क्रीडा

Arjun Tendulkar: रणजी पदार्पणात शतक ठोकणारा 'अर्जुन' गोव्याच्या संघात नाही? 28 खेळाडूंची यादी जाहीर मात्र...

Ranji Trophy 2023-24: गोव्याने रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामासाठी आपल्या 28 संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

Manish Jadhav

Arjun Tendulkar: आयपीएल 2023 पर्यंत अर्जुन तेंडुलकरसाठी सर्व काही ठीक चालले होते. जणू आता त्याला लवकरच टीम इंडियात संधी मिळणार अशी भाकिते वर्तवली जात होती. पण, दुसरीकडे आयपीएलचा 16 वा सीझन संपला आणि अर्जुन तेंडुलकरचं नाव हळूहळू लोकांच्या मनातून ओसरलं.

आता सचिन तेंडुलकरच्या मुलाचे नाव संघांच्या यादीत शोधावे लागेल. त्याने गोव्यासाठी रणजी पदार्पणात शानदार शतक झळकावले होते. पण, जेव्हा गोव्याने रणजी ट्रॉफीच्या 2023-24 हंगामासाठी त्यांच्या संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली, तेव्हा अर्जुन तेंडुलकरचे नाव या यादीतून गायब होते.

दरम्यान, गोव्याने रणजी ट्रॉफी 2023-24 हंगामासाठी आपल्या 28 संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पण, या 28 नावांमध्ये अर्जुन तेंडुलकरचे नाव नाही. अशा परिस्थितीत सचिनचा लाडका लेक अर्जुन कुठे गायब झाला आहे?

तो रणजी ट्रॉफीचा पुढचा हंगाम खेळणार नाही का? आणि जर तो खेळणार असेल तर कोणत्या संघासाठी खेळणार? गोव्याने त्याला त्यांच्या संघात स्थान का दिले नाही? असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत.

अर्जुन तेंडुलकर कुठे आहे?

सर्वप्रथम, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आता कुठे आहे हे बघूया? तर अर्जुन सध्या 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळल्या जाणाऱ्या या देशांतर्गत स्पर्धेत संघाचा भाग आहे. देवधर ट्रॉफीमध्ये दक्षिण विभागाच्या संघात त्याचा समावेश आहे.

दुसरीकडे, दक्षिण विभागीय संघात सामील होण्यापूर्वी अर्जुन एनसीएमध्ये 20 खेळाडूंच्या शिबिराचा भाग बनला होता, ज्याला बीसीसीआयने (BCCI) खास बोलावले होते. दुसरीकडे मात्र गोव्याने रणजी ट्रॉफीसाठी संभाव्य खेळाडूंमध्ये त्याची निवड का केली नाही, हा मोठा प्रश्न आहे आणि त्यासोबतच काही मोठे संकेतही मिळत आहेत.

अर्जुन तेंडुलकरबद्दल अनेक अटकळी?

आयपीएल 2023 च्या 4 सामन्यात 3 बळी घेणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला 2023-24 हंगामासाठी गोव्याच्या रणजी संघात स्थान मिळाले नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, तो यापुढे या संघासोबत पुढील हंगामात खेळणार नाही.

याशिवाय देवधर करंडक स्पर्धेतील दक्षिण विभागीय संघात सामील झाल्याने पुढील मोसमात रणजी करंडक स्पर्धेत दक्षिण विभागाच्या कोणत्याही संघासोबत खेळण्याचा त्याचा मानस आहे की नाही, हे सूचित होत आहे.

असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे अजूनही अनुत्तरित आहेत. रणजी ट्रॉफी 2023-24 चा हंगाम पुढील वर्षी 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chorla Ghat Accident: ..चालकाने मारली उडी, ट्रक गेला दरीत! चोर्ला घाटात दाट धुके, दरड कोसळल्याने दुर्घटना; लाखोंचे नुकसान

Sunburn Dhargalim: धारगळवासीयांचा ‘सनबर्न’ला विरोध, सुनावणीला मात्र गैरहजर; न्यायालयाकडून याचिका निकाली

Goa Politics: ..हा तर लोकशाहीचा खून! विधानसभा रणनीतीच्या बैठकीच्या जागी सभापती तवडकर; विरोधकांचे टीकास्त्र

Goa Politics: विरोधकांच्‍या बैठकीला विजय सरदेसाई, वीरेश गैरहजर! ‘आप’च्‍या दोन्‍ही आमदारांची उपस्‍थिती

Rashi Bhavishya 16 July 2025: आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या, आरोग्याची विशेष काळजी घेणं महत्वाचं

SCROLL FOR NEXT