Arjun Tendulkar Bitten By Dog: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत मंगळवारी 63 वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात होणार आहे. पण भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी आली आहे.
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरला या सामन्याआधी एक कुत्रा चावला आहे. याबद्दल त्याने स्वत:च खुलासा केला आहे. नुकताच लखनऊ सुपर जायंट्सने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये अर्जुन लखनऊ संघातील त्याचे मित्र युधवीर सिंग आणि मोहसिन खान यांना भेटताना दिसत आहे. यावेळी युधवीरशी बोलत असताना अर्जुनने हातावरील जखम दाखवत त्याला सांगितले की त्याला कुत्रा चावला. यानंतर युधवीर आणि मोहसिन यांनी त्याला काळजी घेण्यास सांगितले.
दरम्यान, अर्जुनने आयपीएल 2023 हंगामातून मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले आहे. पण चार सामन्यांनंतर त्याला वगळण्यात आले. त्याने 4 सामन्यांमध्ये खेळताना 3 विकेट्स घेतल्या आहेत.
मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 स्पर्धेत प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे. सध्या मुंबई इंडियन्स आयपीएल 2023 स्पर्धेच्या गुणतालिकेत 12 सामने खेळल्यानंतर 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबईने 7 सामने जिंकले आहेत आणि 5 सामने पराभूत झाले आहेत.
त्यामुळे मुंबईने जर उर्वरित दोन्ही साखळी सामन्यात विजय मिळवल्यास ते गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकावरील स्थान निश्चित करतील. तसेच जर त्यांना दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवता आला, तर मात्र त्यांना प्लेऑफमध्ये जाण्यासाठी अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. तसेच जर मुंबई उर्वरित दोन्ही सामने पराभूत झाले, तर मात्र त्यांचे आव्हान संपुष्टात येऊ शकते.
मुंबई इंडियन्सला लखनऊ सुपर जायंट्सनंतर 21 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळायचा आहे. हैदराबादविरुद्धचा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.