FIFA World Cup 2022 Dainik Gomantak
क्रीडा

Lionel Messi: वर्ल्ड चॅम्पियन मेस्सीच्या तब्बल 6 जर्सींचा होणार लिलाव! विक्रमी बोली लागण्याची अपेक्षा

Lionel Messi Jersey: फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत मेस्सीने घातलेल्या जर्सीचा लिलाव होणार आहे.

Pranali Kodre

Argentina's Lionel Messi announced auction of six jerseys he wore during FIFA World Cup 2022:

लिओनल मेस्सी हा एक लोकप्रिय खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने नुकतेच गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिना संघाने रोमांचक अंतिम सामन्यात फ्रान्सला पेनल्टी शुटआऊटमध्ये पराभवाचा धक्का दिला होता.

दरम्यान, या विजयानंतर आता जवळपास एक वर्षाने मेस्सीच्या जर्सींचा लिलाव होणार आहे. फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेत मेस्सीने घातलेल्या 6 जर्सींचा लिलाव होणार आहे, यामध्ये त्याने अंतिम सामन्यात परिधान केलेल्या जर्सीचाही समावेश आहे.

हा लिलाव सोथबे संस्थेकडून केला जाणार आहे. सोथबेला आशा आहे की हा खेळातील सर्वात मैल्यवान ठेवा ठरेल.

या लिलाव प्रक्रियेतून येणाऱ्या मोबदल्याचा भाग UNICAS प्रोजेक्टला दिला जाणार आहे. हा प्रोजेक्ट ब्रार्सिलोनामधील सेंट जॉन दे देऊ या लहान मुलांच्या हॉस्पिटलद्वारे चागवला जात आहे. या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या दुर्मिळ आजारांवर उपचार केले जातात.

दरम्यान, या लिलावातील किती मोबदला दान केला जाणार आहे, याबद्दल मात्र माहिती मिळालेली नाही. पण या लिलावाबाबत मेस्सीने पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने त्याच्या सहा जर्सींचे सॉथबेकडून लिलाव केला जाणार असल्याचे म्हटले आहे.

हा लिलाव 30 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान केला जाणार आहे. या लिलावातून 10 मिलियन अमेरिकन डॉलर मिळण्याची आशा आहे.

मेस्सी फिफा वर्ल्डकप 2022 मधील सर्वोत्तम खेळाडूही ठरला होता. तसेच काही दिवसांपूर्वीच त्याने विक्रमी आठव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT