Argentina Team  Dainik Gomantak
क्रीडा

FIFA World Cup: जगज्जेता अर्जेंटिना मायदेशात पोहोचला, पण मोठा अपघात होता होता राहिला, पाहा Video

अर्जेंटिना संघ मायदेशात विजयाचे सेलिब्रेशन करत असताना मोठा अपघात टळला.

Pranali Kodre

Argentina: रविवारी अर्जेंटिनाने फिफा फुटबॉल वर्ल्डकप 2022 स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. अजूनही त्यांच्या या विजेतेपदाचा उत्साह कमी झालेला दिसून आलेला नाही. अर्जेंटिनाचा संघ वर्ल्डकप जिंकून मायदेशात परतल्यानंतर त्यांचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले आहे. तसेच अर्जेंटिनामध्ये बँक हॉलिडे जाहीर केला आहे.

मात्र, या स्वागतादरम्यान एक गंभीर घटना घडता घडता टळली. विश्वविजेत्या अर्जेंटिनाच्या संघातील खेळाडू मोठा अपघात होण्यापासून थोडक्यात बचावले. यात कर्णधार मेस्सीचाही समावेश होता.

झाले असे की अर्जेंटिनाचा संघ वर्ल्डकप विजयानंतर मायेदशात पोहचल्यानंतर ओपन-टॉप बसमधून चाहत्यांच्या गराड्यातून पुढे जात होता. त्यावेळी बसच्या अगदी वर मेस्सीसह एंजल डी मारिया, लिन्डो पॅरेडेस, निकोलस ओटामेंदी हे खेळाडू बसले होते.

पण एका क्षणी ते इलेक्ट्रिसीटी केबलला धडकणारच होते. पण, त्यांच्या लगेचच हे लक्षात आले आणि सर्व खेळाडू खाली वाकले. त्यामुळे मोठा अपघात होता होता राहिला. मात्र यानंतर संघाचे सेलिब्रेशन पुढे कायम राहिले.

अर्जेंटिनाने फिफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फ्रान्सचा पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 अशा फरकाने पराभव करत हे विजेतेपद जिंकले. याबरोबरच अर्जेंटिनाने 36 वर्षांचा त्यांचा विश्वविजेतेपदाचा दुष्काळ संपवला. त्यामुळे अर्जेंटिनाच्या आनंदात आणखीनच भर पडली. अर्जेंटिनाने यापूर्वी 1986 मध्ये विश्वचषक जिंकला होता.

दरम्यान, फिफा वर्ल्डकप 2022 जिंकल्यानंतर लिओनल मेस्सी आणि संपूर्ण अर्जेंटिना संघ मंगळवारी मायदेशात पोहचला. कतारहून अर्जेंटिनापर्यंत खेळाडूंना आणलेल्या विमानाच्या टेलला मेस्सीचे मोठे पोस्टरही लावण्यात आले होते.

दरम्यान अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सी हातात वर्ल्डकप ट्रॉफी घेऊनच विमानातून खाली उतरला. त्याच्या मागोमाग संपूर्ण संघ खाली उतरला. त्यांना अगदी विमानतळापासूनच चाहत्यांनी गराडा घातला होता.

अर्जेंटिनाचा संघही विमानतळापासून ओपन-टॉप बसमधून फुटबॉल असेसिएशनच्या हेडक्वार्टरपर्यंत गेला. या दरम्यानचा मार्ग पूर्ण चाहत्यांनी भरलेला होता आणि ते अर्जेंटिनाच्या विजयाच्या आनंदात मोठमोठ्याने आरोळ्या देत होते. यादरम्यान अर्जेंटिनाचा खेळाडू एन्झो फर्नांडेजने बसमध्ये ड्रमही वाजवला.

अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स शहरातील ही दृश्य अगदी थक्क करणारी होती. त्यांचे फोटो आणि व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.

अर्जेंटिनाचा अंतिम सामन्यात विजय

अर्जेंटिनाकडून अंतिम सामन्यात शानदार सुरुवात झाली होती. अर्जेंटिनाकडून कर्णधार लिओनल मेस्सीने पहिला गोल नोंदवला होता, तर एंजेल डी मारियाने अर्जेंटिनाकडून दुसरा गोल केला. मात्र दुसऱ्या हाफमध्ये फ्रान्सचे कायलिन एमबाप्पेने 80 आणि 81 व्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल केले. त्यामुळे सामन्याला वेगळे वळण मिळाले.

हा सामना ज्यादा वेळेतही खेळवण्यात आला, ज्यात मेस्सी आणि एमबाप्पे यांनी प्रत्येकी 1 गोल केला. त्यामुळे 3-3 अशी बरोबरी झाली आणि अखेर पेनल्टी शुटआऊटमध्ये निकाल लागला. पेनल्टी शुटआऊटमध्ये अर्जेंटिनाने 4-2अशा फरकाने विजय मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT