Aren's dream is to make a name for himself in the Hyderabad team
Aren's dream is to make a name for himself in the Hyderabad team 
क्रीडा

हैदराबाद संघात नावलौकिक मिळविण्याचे आरेनचे स्वप्न

दैनिक गोमंतक

पणजी :  मेहनतीच्या बळावर हैदराबाद एफसी संघात (Hyderabad team) नावलौकिक होण्याचे स्वप्न (Dream) युवा गोमंतकीय आघाडीपटू आरेन डिसिल्वा (Aren DeSilva) याने बाळगले आहे. इंडियन सुपर लीग (ISL) (आयएसएल) संघाने या 23 वर्षीय फुटबॉलपटूस (Football) तीन वर्षांसाठी शुक्रवारी करारबद्ध केले. (Aren's dream is to make a name for himself in the Hyderabad team)

एफसी गोवा माजी खेळाडू आरेन नव्या करारानुसार 2023-24 मोसमअखेपर्यंत हैदराबाद एफसी संघात असेल. मानोलो मार्किझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघात आरेन नवा चेहरा आहे.

हैदराबाद एफसी संघात सामील झाल्याने मी उत्साहित झालो आहे. माझे प्रशिक्षकांशी बोलणे झाले असून त्यामुळे प्रेरित झालो आहे. संघाचा भाग बनून मेहनतीच्या बळावर नावलौकिक मिळवायचा आहे, असे करारपत्रावर सही केल्यानंतर आरेनने सांगितले.

आरेनने कारकिर्दीच्या सुरवातीस सेझा फुटबॉल अकादमीचे चार वर्षे प्रतिनिधित्व केले. 19 वर्षांखालील आय-लीग स्पर्धेत तो धेंपो स्पोर्टस क्लबतर्फे खेळला, तर 2016-17 मोसमातील गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेत तो केळशीच्या सांताक्रूझ क्लब संघात होता. 2017 साली आरेन एफसी गोवाच्या डेव्हलपमेंटल संघात दाखल झाला. 2020-21 मोसमात त्याला एफसी गोवाच्या सीनियर संघात बढती मिळाली. 

गोवा प्रोफेशनल लीग स्पर्धेतील चार मोसमात आरेनने 25 गोल नोंदविले, तर द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेत 10 गोलची नोंद केली. 2017 साली संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या गोव्याच्या संघात आरेनचा समावेश होता. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: खलपांनी 3.50 लाख गोमन्तकीयांना लुटले, विरियातोंची उमेदवार म्हणून लायकी नाही; सांकवाळमध्ये सावंत, तानावडे बरसले

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

America Banking Crisis: अमेरिकेतील बँकिंग सेक्टरला मोठा धक्का; आणखी एक बँक बुडाली

SCROLL FOR NEXT