धीरज सिंग Dainik Gomantak
क्रीडा

एफसी गोवाच्या सांघिक भावनेचे प्रशिक्षकांकडून कौतुक

आणखी संधी आणि परिश्रम घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे

दैनिक गोमन्तक

पणजी: एफसी गोवा संघाने इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेत बंगळूर एफसीविरुद्ध एक खेळाडू कमी होऊनही जिगरबाज विजय नोंदविला. सलग तीन पराभवानंतर त्यांनी शनिवारी रात्री स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला. त्यानंतर मुख्य प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी आपल्या संघाच्या सांघिक भावनेचे कौतुक केले.

सांघिक आत्मबळ आणि स्वभाववृत्ती यामुळेच सामना जिंकणे शक्य झाले, असे 40 वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षक फेरांडो यांनी सांगितले. एफसी गोवाने बांबोळी येथील थलेटिक्स स्टेडियमवर बंगळूरला 2-1 फरकाने हरविले. त्यापूर्वी त्यांनी ईस्ट बंगालला 4-3 फरकाने नमविले होते. स्पर्धेत अगोदर अनुक्रमे मुंबई सिटी, जमशेदपूर एफसी व नॉर्थईस्टविरुद्धच्या पराभवामुळे एफसी गोवा संघ दबावाखाली होता.

बंगळूरविरुद्धच्या (Bangalore) विजयाचे विश्लेषण करताना फेरांडो म्हणाले, सामन्याच्या पूर्वार्धात आम्ही चांगला खेळ करताना उत्कृष्ट कामगिरी प्रदर्शित केली. आम्ही आक्रमणात, तसेच बचावात वरचढ होतो. 1-1 बरोबरीनंतर संघासाठी वाटचाल कठीण ठरली, त्यातच उत्तरार्धात संघाच्या आत्मविश्वासावरही परिणाम झाला. रेड कार्डनंतर संघासाठी खूपच खडतर परिस्थिती होती. मात्र त्यांनी गोलफरक बदलला, त्यास संघाचे आत्मबळ कारणीभूत ठरले. खेळाडूंची स्वभाववृत्तीही खूपच चांगली ठरली. यामुळे मी खूप आनंदित आहे. संघातील, तसेच राखीव फळीतील खेळाडूंनीही संघाच खूप मदत केली. FC गोवाने आघाडी घेतल्यानंतर बचावावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी मान्य केले.

संक्रमणात सुधारणा आवश्यक

एफसी गोवाने सलग दोन सामने जिंकले, तरीही प्रशिक्षक फेरांडो पूर्ण खूष नाहीत. संक्रमणात संघाला सुधारणा आवश्यक आहे आणि ही बाब फुटबॉलमध्ये अतिशय महत्त्वाची ठरते, असे त्यांनी नमूद केले. FC गोवा संघ आक्रमक शैलीवर भर देत असल्याने नियंत्रण आवश्यक असल्याचे फेरांडो यांना वाटते. आम्ही चुका करतो, कारण तत्काळ दबाव टाकण्यावर आमचा भर नसतो, अशी कबुली त्यांनी दिली.

गोलरक्षक धीरजची पाठराखण

ईस्ट बंगालविरुद्ध FC गोवाचा 21 वर्षीय गोलरक्षक धीरज सिंगने सेटपिसवर गोल स्वीकारला. यावेळी गोलरक्षकाची चूक स्पष्टपणे जाणवत होती, मात्र प्रशिक्षक फेरांडो यांनी संघाच्या युवा गोलरक्षकाची पाठराखण करत त्याच्यावर विश्वास दाखविला. धीरजसाठी एक क्षण कठीण ठरला, पण आम्ही त्याला पाठिंबा देतो. त्याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे, मला धीरजबद्दल चिंता नाही. तो फक्त 21 वर्षांचा असून भारतीय राष्ट्रीय संघाचा भावी गोलरक्षक आहे. त्याला आणखी संधी आणि परिश्रम घेण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे, असे FC गोवाचे प्रशिक्षक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT