Virat Kohli - Anushka Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Video Viral: अनुष्काबरोबर 'डान्स पे चान्स' मारायला गेला विराट अन्... पुढे काय झालं एकदा पाहाच

Video: विराट आणि अनुष्का यांचा जिममध्ये डान्स करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Anushka Sharma and Virat Kohli dancing: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहलीसाठी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा आत्तापर्यंत शानदार सुरु आहे. त्याने फलंदाजीबरोबर बेंगलोरचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतग्रस्त असताना संघाचे चांगले नेतृत्वही केले आहे. अशातच त्याचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये विराट त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माबरोबर जिममध्ये डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच तिने या व्हिडिओला 'चान्स पे डान्स' असे कॅप्शनही दिले आहे.

या व्हिडिओमध्ये दिसते की विराट आणि अनुष्का जिममध्ये असून पंजाबी गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे. त्यावेळी विराट आणि अनुष्का डान्स करण्यास सुरु करतात. पण यादरम्यान अचानक विराट पायाच्या तळव्याला धरलेले असताना वेदनेने ओरडतो आणि फ्रेममधून बाहेर होतो. त्याला असे पाहून अनुष्कालाही हसू आवरत नाही.

हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरत असला तरी अनेक चाहत्यांनी विराट-अनुष्काला काळजी घेण्याचा सल्लाही दिला आहे. चाहत्यांनी विराटला आयपीएल सुरु असताना आणि आगामी काळात कसोटी चॅम्पियशीपचा अंतिम सामना आणि वर्ल्डकप खेळायचा असल्याने दुखापतीची काळजी घेण्यास सांगितले आहे.

राजस्थानविरुद्ध दिसलेला विराटचा रोमँटिक अंदाज

रविवारी (23 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झालेल्या सामन्यात यशस्वी जयस्वालचा झेल घेतल्यानंतर विराटचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला होता. त्याने हा झेल घेतल्यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या अनुष्का शर्माला फ्लाइंग किस दिले होते.

विराट चांगल्या फॉर्ममध्ये

विराट आयपीएल 2023 मध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने आत्तापर्यंत 7 सामन्यांमध्ये 46.50 च्या सरासरीने 279 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे नेतृत्व करताना विजयही मिळवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT