Antim Panghal Dainik Gomantak
क्रीडा

World Championships: पांघलने पदक जिंकून ऑलिम्पिक तिकीट मिळवलं, पण तिरंग्यासह करता आलं नाही सेलिब्रेशन, कारण...

Antim Panghal: अंतिम पांघलन वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकत पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवली आहे.

Pranali Kodre

Antim Panghal secure Paris Olympics quota with bronze Medal at Wrestling World Championships 2023:

भारताची स्टार युवा कुस्तीपटू अंतिम पांघलने गुरुवारी ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. तिने बेलग्रेडला झालेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद (World Championships) स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली. याबरोबरच तिने पुढीलवर्षी पॅरिसला होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली.

गुरुवारी अंतिमने दोन वेळच्या युरोपियन चॅम्पियन एम्मा जोना डेनिस मालमग्रेन हिला 16-6 फरकाने पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले. हे पदक जिंकत ती पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवणारी पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.

यापूर्वी तिने ऑगस्ट 2023 मध्ये दुसऱ्यांदा 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे ती सलग दोनदा विश्वविजेती होणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

अंतिमने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी केली होती. तिने पहिल्या राउंडलाच गतविजेत्या अमेरिकेच्या ओलिव्हिया डॉमिनिक पॅरिशला पराभूत करत सर्वांना चकीत केले होते.

त्यानंतरही तिने शानदार कामगिरी सुरू ठेवलेली, मात्र तिला उपांत्य फेरीत ऑलिम्पिक पदक विजेत्या वेनेसा कलादजिंस्कायाविरुद्ध शेवटच्या क्षणी 5-4 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे ती खूप भावूक झाली होती. मात्र, अखेर तिने कांस्य पदकाच्या लढतीत विजय मिळवत आपली क्षमता सिद्ध केली.

दरम्यान, अंतिमने गुरुवारी कांस्य पदक जिंकले असले, तरी तिला भारताच्या तिरंग्यासह आनंद साजरा करता आला नाही. ती पदक स्विकारतानाही पोडियमवरही संयुक्त जागतिक कुस्ती संघटनेची खेळाडू म्हणून उभी राहिली.

यामागचे कारण म्हणजे जागतिक संघटनेने भारतीय कुस्ती संघटनेचे निवडणूका वेळेत न घेतल्याप्रकरणी बंदी घातली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय खेळाडू तिरंग्याखाली खेळू शकले नाही.

अंतिम आठवी भारतीय कुस्तीपटू

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकणारी अंतिम भारताची आठवी महिला कुस्तीपटू ठरली आहे. तिच्यापूर्वी अलका तोमर (2006), गीता फोगाट (2012), बबीता फोगाट (2012), पुजा ढांडा (2018), विनेश फोगट (2019, 2022), सरिता मोर (2021) आणि अंशू मलिक (2021) यांनी या स्पर्धेत पदक जिंकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT