Antim Panghal Dainik Gomantak
क्रीडा

Wrestling World Championships: 19 वर्षीय अंतिम पांघलची शानदार सुरुवात, वर्ल्ड चॅम्पियनला पहिल्याच राउंडला लोळवले

Pranali Kodre

Antim Panghal beat Olivia Dominique Parrish in Wrestling World Championships:

भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पांघलने बुधवारी सर्वांना चकीत करणारी कामगिरी करून दाखवली आहे. तिने वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत अमेरिकेच्या ओलिव्हिया डॉमिनिक पॅरिशला पहिल्याच राउंडमध्ये पराभूत करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे तिने पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

बुधवारी पांघलचा डॉमिनिक पॅरिशविरुद्ध महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात सामना झाला होता. या सामन्यात 0-2 अशा फरकाने पांघलला पिछाडी स्विकारावी लागली होती. डॉमिनिक पॅरिशने आक्रमक सुरुवात केली होती.

सुरुवातीच्या पिछाडीनंतर 19 वर्षींय पांघलने पुनरागमन करत चांगला बचाव करत डॉमिनिक पॅरिशला आणखी गुण मिळवू दिले नाही. नंतर पांघनेही आक्रमण करत सामन्यात विजय मिळवला.

त्यानंतर तिने पुढच्या बाउंडमध्ये पोलंडच्या रुक्साना मार्ता झासिनाला तांत्रिक बाजूने वर्चस्व मिळवत मात दिली आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. रुक्साना मार्ता झासिनाला पांघलने केवश 1 मिनिट आणि 38 सेकंदात पराभूत केले.

दरम्यान, अंतिम पांघल या स्पर्धेनंतर चीनमध्ये होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सहभागी होणार आहे. तिला विनेश फोगाटच्या जागेवर संधी मिळाली आहे.

तिने काही दिवसांपूर्वीच ऑगस्ट 2023 मध्ये दुसऱ्यांदा 20 वर्षांखालील वर्ल्ड चॅम्पियनशीपचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे ती सलग दोनदा विश्वविजेती होणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT