Anshuman Gaikwad Dainik Gomantak
क्रीडा

टीम इंडियाचा 'धुंरधर' ज्याने विरोधकांना केलं होतं नामोहरम; जो पुढे बनला भारताचा कोच

आज त्याच अंशुमन गायकवाड (Anshuman Gaikwad) यांचा 69 वा वाढदिवस आहे.

दैनिक गोमन्तक

जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघातील (Indian Cricket Team) सर्वात आक्रमक क्रिकेटपटूंची चर्चा होईल, तेव्हा त्यात अनेक दिग्गजांची नावे येतील, जे कठीण परिस्थितीत हार मानण्याऐवजी आघाडीवर उभे राहिले. कधी संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला तर कधी कधी हातून सुटत चाललेला सामना परत जिंकला, तर कधी विरोधकांना आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून योग्य तो संदेश पोहोचवला. असाच एक टीम इंडियाचा माजी अनुभवी फलंदाज ज्याने आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये नवनवे विक्रम आपल्या नावावर ते म्हणजे अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad). अंशुमन गायकवाड 1970 च्या दशकात भारतीय संघात सलामीचे फलंदाज राहिले. महान फलंदाज सुनील गावस्कर एका टोकापासून धावा काढत असत, तर गायकवाड त्यांच्यासोबत डावाच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना रोखण्यात आणि निष्प्रभ करण्यात पारंगत होते. आज त्याच अंशुमन गायकवाड यांचा 69 वा वाढदिवस आहे.

अंशुमन गायकवाड यांचा जन्म 23 सप्टेंबर 1952 रोजी बॉम्बे (Mumbai) येथे झाला. त्यांचे वडीलही एक कसोटी क्रिकेटपटू होते, तसेच त्यांनी भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. वरवर पाहता त्यांचा अंशुमनवरही परिणाम झाला आणि त्यानेही क्रिकेटला आपले विश्व बनवले. त्याने बडोद्यातून (Baroda) प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, जिथून भारतीय क्रिकेट संघाचे दार त्याच्यासाठी उघडले. त्याने 27 डिसेंबर 1974 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता (Kolkata) कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्या डावातच 36 धावा केल्या.

गायकवाडने त्याच्या बचावात्मक फलंदाजीमुळे भारतीय संघातील आपले स्थान बळकट केले. सुनील गावसकरसह सलामीला येताना, नवीन चेंडू आणि वेगवान गोलंदाजांची धार बोथट करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. आणि तो यामध्ये माहीरही होता. विशेषत: वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने उत्तम कामगिरी केली. त्या बदल्यात त्याला विंडीजच्या वेगवान गोलंदाजांचा अनेक वेळा सामना करावा लागला. याचे सर्वात मोठे उदाहरण 1976 च्या किंग्स्टन टेस्टमध्ये दाखवण्यात आले.

कानाला दुखापत

त्या दौऱ्यात भारतीय संघाने पोर्ट ऑफ स्पेनमध्ये (Port of Spain) तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करुन वेस्ट इंडिजला आश्चर्यचकित केले. या धक्क्याने वेस्ट इंडिजचा संघ स्तब्ध झाला आणि क्लाईव्ह लॉयडच्या वेगवान बॅटरीने किंग्स्टन कसोटीत भारतीय फलंदाजांवर शॉर्ट-बॉलच्या माध्यमातून लक्ष करण्यास सुरुवात केली. सुनील गावस्कर आणि गायकवाड यांच्यात 136 धावांची जबरदस्त सलामी भागीदारी झाली. यादरम्यान, मायकेल होल्डिंगच्या नेतृत्वाखाली विंडीजच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना लक्ष करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे वाईट परिणाम दिसून आले. यातच एक चेंडू अंशुमन गायकवाडच्या कानाला लागला, ज्यामुळे कानातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि त्याला मधूनच 81 धावांची दमदार खेळी सोडावी लागली. त्याच्या कानाचा पडदा फाटला होता, ज्यावर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर, ब्रिजेश पटेल देखील अशाच प्रकारच्या दुखापतीमुळे रुग्णालयात पोहोचला. गायकवाड, पटेल आणि गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Vishwanath) असे तीन वरिष्ठ फलंदाज दुसऱ्या डावात उतरु शकले नाहीत, तर कर्णधार बिशनसिंग बेदीने (Bishan Singh Bedi) 5 विकेटनंतर डाव घोषित केला आणि पराभव स्वीकारला, कारण खेळाडूंना दुखापत होताना बघायची त्याची इच्छा नव्हती.

दुहेरी शतक

कारकिर्दीच्या सुरुवातीला असा अनुभव घेतल्यानंतरही अंशुमनने हार मानली नाही आणि त्यानंतरही वेस्ट इंडिजविरुद्ध अनेक सामने खेळले आणि शतक झळकावले. त्या 81 धावांच्या खेळीव्यतिरिक्त अंशुमन गायकवाडनेही उत्तम फलंदाजी केली, परंतु त्याची सर्वात उल्लेखनीय खेळी पाकिस्तानविरुद्ध जालंधर कसोटीतील होती. 24 सप्टेंबर 1983 रोजी अंशुमनने जालंधरमध्ये पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 201 धावांची खेळी उभारली, परंतु अशी एक खेळी होती, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. तो 671 मिनिटे क्रीजवर होता, त्याने 436 चेंडूंमध्ये या धावा केल्या. त्याने द्विशतक उभारले.

क्रिकेट करिअर आणि कोचिंग

अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी शेवटची कसोटी 1984 मध्ये कोलकाता येथे इंग्लंडविरुद्ध खेळली. त्याच्या कारकीर्दीत त्याने 40 कसोटी सामने खेळले, ज्यात 1985 धावा त्याच्या खात्यात 30 च्या रनरेट होता. यादरम्यान त्याने 2 शतके केली आणि 10 अर्धशतकेही ठोकली. त्याने 15 एकदिवसीय सामनेही खेळले, परंतु तेथे त्याला फक्त 289 धावा करता आल्या. 1997 मध्ये, त्याच्या क्रिकेट कारकीर्दीच्या समाप्तीनंतर अनेक वर्षांनी, ते प्रथमच भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले होते. दोन वर्षे प्रशिक्षक राहिल्यानंतर कपिल देव यांनी 1999 मध्ये त्यांची जागा घेतली. मात्र, मॅच फिक्सिंगच्या आरोपांनंतर कपिल देव यांना माघार घ्यावी लागली आणि गायकवाड पुन्हा 3 महिन्यांसाठी प्रशिक्षक बनले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT