Andre Russell-Sherfane Rutherford X/ICC
क्रीडा

AUS vs WI: रसेल - रुदरफोर्डची चौकार-षटकारांची आतिषबाजी! ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची शाळा घेत रचला वर्ल्ड रेकॉर्ड

Andre Russell-Sherfane Rutherford: ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात शेरफेन रुदरफोर्ड आणि आंद्रे रसेल यांनी आक्रमक फलंदाजी करत विश्वविक्रमी भागीदारी केली.

Pranali Kodre

Andre Russell-Sherfane Rutherford Partnership Record:

मंगळवारी (१३ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघात टी20 मालिकेतील अखेरचा सामना पर्थला पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने 37 धावांनी विजय मिळवत व्हाईटवॉश टाळला. याच सामन्यात वेस्ट इंडिजकडून शेरफेन रुदरफोर्ड आणि आंद्रे रसेलने मिळून विश्वविक्रमी भागादीरी केली.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण वेस्ट इंडिजने 9 षटकांच्या आतच 79 धावांतच 5 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र 9 व्या षटकात रुदरफोर्ड आणि रसेल यांची जोडी एकत्र आली आणि त्यांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली.

त्यांनी संघाला त्यांच्या आक्रमक फलंदाजीने 200 धावांचा आकडा सहज पूर्ण करून दिला. तसेच त्यांनी वेस्ट इंडिजसाठी टी20 क्रिकेटमध्ये वैयक्तिक सर्वोच्च धावांची खेळीही केली. दरम्यान त्यांची जोडी अखेरच्या षटकात रसेलला बाद करत स्पेन्सर जॉन्सनने तोडली.

रसेल 29 चेंडूत 4 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 71 धावा करून बाद झाला. तसेच अखेरीस रुदरफोर्ड 40 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 67 धावा करून नाबाद राहिला. त्यामुळे वेस्ट इंडिजने 20 षटकात 6 बाद 220 धावा केल्या.

रुदरफोर्ड आणि रसेलची विक्रमी भागीदारी

दरम्यान, रुदरफोर्ड आणि रसेल यांच्यात 6 व्या विकेटसाठी 66 चेंडूत 139 धावांची भागीदारी झाली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 6 व्या विकेटसाठी केलेली ही सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यांनी टोनी उरा आणि नॉर्मन वेनुवा यांनी पापुआ न्यू गिनीसाठी 2022 मध्ये सिंगापूरविरुद्ध सहाव्या विकेटसाठी केलेल्या 115 धावांच्या विक्रमाला मागे टाकले.

इतकेच नाही तर रुदरफोर्ड आणि रसेल यांच्यातील 139 धावांची भागीदारी ही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजकडून कोणत्याही विकेटसाठी केलेली तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारीही ठरली.

आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 6 व्या विकेटसाठी केलेली सर्वोच्च भागीदारी

  • 139 धावा - शेरफेन रुदरफोर्ड आणि आंद्र रसेल (वेस्ट इंडिज वि. ऑस्ट्रेलिया)

  • 115 धावा - टोनी उरा आणि नॉर्मन वेनुवा (पापुआ न्यू गिनी वि. सिंगापूर)

  • नाबाद 101 धावा - माईक हसी आणि कॅमेरून व्हाईट (ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका)

वेस्ट इंडिजसाठी आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च भागीदारी

  • 152 धावा - मार्लोन सॅम्युअल्स आणि ख्रिस गेल (विरुद्ध द. आफ्रिका, 2015)

  • 145 धावा - ख्रिस गेल आणि डेवॉन स्मिथ (विरुद्ध द. आफ्रिका, 2007)

  • 139 धावा - शेरफेन रुदरफोर्ड आणि आंद्र रसेल (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2024)

  • 135 धावा - जॉन्सन चार्ल्स आणि काईल मेयर्स (विरुद्ध द. आफ्रिका, 2023)

ऑस्ट्रेलियाचा पराभव

दरम्यान, वेस्ट इंडिजने दिलेल्या 221 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यांना 20 षटकात 5 बाद 183 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हि़ वॉर्नरने 81 धावांची खेळी केली. तसेच टीम डेव्हिडने 41 धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच अकील हुसेनने 1 विकेट घेतली.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या टी20 मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असल्याने त्यांनी ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao Municipal Council: उघड्यावर शौच केल्यास होणार दंडात्मक कारवाई; स्वच्छतेच्या बाबतीत मडगाव पालिकेची नोटीस

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT