K Maheep Kumar And Shaik Rashid Dainik Gomantak
क्रीडा

CK Nayudu Trophy : आंध्रची स्थिती खूपच मजबूत; गोव्यावर 272 धावांची आघाडी

के. महीप कुमार याचे शानदार शतक

किशोर पेटकर

CK Nayudu Trophy : सलामीच्या के. महीप कुमार याचे शानदार शतक, त्याने शेख राशिद याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी केलेली 149 धावांची दमदार भागीदारी, तसेच तळाच्या फलंदाजांनी लढवलेला किल्ला यामुळे कर्नल सी. के. नायडू करंडक 25 वर्षांखालील क्रिकेट सामन्यात आंध्रने खूपच मजबूत स्थिती गाठली.

त्यांनी गोव्यावर पहिल्या डावात 272 धावांची भक्कम आघाडी घेतली. पर्वरी येथे सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आंध्रने कालच्या 1 बाद 123 वरून सर्वबाद 378 धावा केल्या.

दिवसभरातील बाकी पाच षटकांत गोव्याने बिनबाद आठ धावा केल्या. पहिल्या डावात 106 धावांत गारद झालेला यजमान संघ आता 264 धावांनी मागे आहे. पराभव टाळण्यासाठी गोव्याला भरपूर मेहनत घ्यावी लागेल हे स्पष्ट आहे.

मोसमातील चौथे शतक

कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात माहीप कुमार याने वैयक्तिक चौथे शतक ठोकले. यामध्ये दोन द्विशतकांचाही समावेश आहे. त्याने 120 धावांची खेळी केली. 257 चेंडूंचा सामना करताना 15 चौकार मारले.

महीपला शेख राशिद याची चांगली साथ लाभली. गतवर्षी 19 वर्षांखालील विश्वकरंडक विजेत्या भारतीय संघातून खेळताना महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या राशिदचे शतक 12 धावांनी हुकले. लेगस्पिनर मनीष काकाडे याने त्याला वैयक्तिक 88 धावांवर योगेश कवठणकरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.

18 वर्षीय फलंदाजाने १४७ चेंडूंतील खेळीत 18 चौकार लगावले. महीपला फिरकी गोलंदाज योगेश कवठणकर याने त्रिफळाचीत बाद केले. त्यापूर्वी त्याने यारा संदीप (21) याच्या साथीत तिसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भर टाकली.

अखेरच्या तीन विकेटतर्फे 82 धावा

गोव्याच्या फिरकी गोलंदाजांनी आंध्रची स्थिती 7 बाद 296 अशी केली असता, त्यांच्या शेवटच्या तीन विकेटतर्फे धावसंख्येत 82 धावांची भर टाकली. त्यामुळे पाहुण्या संघाची आघाडी वाढली.

कर्णधार गिरिनाथ रेड्डी (32) याने पृदवी (नाबाद 23) याच्या साथीत आठव्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी केली. गोव्याचा कर्णधार दीपराज गावकरने गिरिनाथला त्रिफळाचीत बाद करून ही जोडी फोडली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : सर्वबाद 106 व दुसरा डाव : 5 षटकांत बिनबाद 8 (राहुल मेहता नाबाद 7, मंथन खुटकर नाबाद 1).

आंध्र, पहिला डाव (1 बाद 123 वरून) : 121.3 षटकांत सर्वबाद 378 (के. माहीप कुमार 120, शेख राशिद 88, यारा संदीप 21, एस. तरुण 25, ध्रुवकुमार रेड्डी 14, गिरिनाथ रेड्डी 32, पृदवी नाबाद 23, एम. अंजनेयेलू 12, शुभम तारी 16-3-69-0, समीत आर्यन मिश्रा 22-7-49-1, दीपराज गावकर 15-3-30-1, कीथ पिंटो 23.3-3-65-3, मनीष काकोडे 18-3-73-3, योगेश कवठणकर 11-1-31-1, दीप कसवणकर 16-2-37-1).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

Babu Ajgaonkar: 'माझे कितीही पुतळे जाळा, मी 2027 ची निवडणूक लढवणारच'! बाबू आजगावकरांचा निर्धार

Anmod Ghat: अनमोड घाटाबाबत नवी अपडेट! अवजड वाहतुकीसाठी रस्ता राहणार बंद; 'या' वाहनांना मिळणार सूट

Vijai Sardesai: सरदेसाईंच्या मोहिमेमुळे काँग्रेस, आप अस्वस्थ! नाव न घेता युरींचे टीकास्त्र; राजकीय वर्तुळात घमासान

Ashadhi Ekadashi: दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरी! सुख दुःखाची शिकवण देणारी 'वारी'

SCROLL FOR NEXT