Lionel Messi | Anderson Talisca AFP and X/AlNassrFC_EN
क्रीडा

Al-Nassr vs Inter Miami: हॅट्रिक केल्यानंतर मेस्सीसमोरच तालिस्काचे रोनाल्डोप्रमाणे Siuu सेलिब्रेशन, पाहा Video

Messi vs Ronaldo: अल-नासर आणि इंटर मियामी सामन्यात गोलची हॅट्रिक साधल्यानंतर तालिस्काने Siuu सेलिब्रेशन केले तेव्हा मेस्सी आणि रोनाल्डोही स्टेडियममध्ये उपस्थित होते.

Pranali Kodre

Anderson Talisca Siuu celebration during Al Nassr vs Inter Miami:

रियाध कप स्पर्धेदरम्यान अल-नासर आणि इंटर मियामी संघात गुरुवारी (1 फेब्रुवारी) सामना झाला. किंगडम एरिना स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अल नासरने 6-0 अशा फरकाने विजय मिळवला. या सामन्यात अँडरसन तालिस्काने सर्वांचेच लक्ष वेधले.

तालिस्का अल-नासरच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने या सामन्यात अल-नासरसाठी तीन गोल करत हॅट्रिक साधली. यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरले.

तालिस्काने 10 व्या मिनिटालाच पहिला गोल केला होता. त्यानंतर त्याने 51 व्या मिनिटाला पेनल्टीवर आणि 73 व्या मिनिटाला मैदानी गोल करत हॅट्रिक केली. या हॅट्रिकनंतर त्याने आधी हात वर करून सर्वांचे लक्ष वेधत ख्रिस्तियानो रोनाल्डोप्रमाणे स्यू (Siuu) सेलिब्रेशन केले.

विशेष म्हणजे त्यावेळी स्टेडियमममध्ये रोनाल्डोसह लिओनल मेस्सी देखील उपस्थित होता. रोनाल्डो आणि मेस्सी हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी खेळाडू समजले जातात. त्याचमुळे मेस्सी आणि रोनाल्डो हे दोघेही समोर असताना तालिस्काने केलेले सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरला.

रोनाल्डो सामन्याला मुकला, तर मेस्सीची लेट एन्ट्री

खरंतर अल-नासर आणि इंटर मियामी यांच्यातील सामन्याची उत्सुकता गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये होती. कारण रोनाल्डो आणि मेस्सी हे आमने-सामने येण्याची ही कदाचित अखेरची वेळ असू शकते, असे म्हटले जात होते.

मात्र, अल-नासर संघात असलेला रोनाल्डो पोटरीच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही, तसेच मेस्सी देखील हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करत आहे. त्यामुळे तो देखील सामन्याच्या 83 व्या मिनिटाला सब्स्टिट्यूट म्हणून मैदानात उतरला होता. मेस्सी मैदानात येईपर्यंत अल-नासरने मियामीवर पूर्ण वर्चस्व मिळवले होते.

अल नासरकडून या तालिस्काव्यतिरिक्त ओटाविओने या सामन्यात तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला होता. तसेच आयमेरिक लापोर्टेने 12 व्या मिनिटाला आणि मोहम्मद मारननेही 68 व्या मिनिटाला गोल केला. मियामीकडून कोणालाही गोल करता आला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT