Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG: अँडरसनचा जड्डूच्या फलंदाजीवर प्रश्न म्हणाला, ...यामुळे आम्ही अडचणीत आलो आहोत

रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच शतक झळकावले.

दैनिक गोमन्तक

रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच शतक झळकावले. त्याच्या आणि ऋषभ पंतच्या शतकाच्या जोरावर टीम इंडियाने (Team India) इंग्लंडविरुद्धच्या 5व्या कसोटीमध्ये (IND vs ENG) आपली स्थिती मजबूत केली. भारतीय संघाने पहिल्या डावात 416 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने पहिल्या डावात 5 विकेट गमावत 84 रन्स केल्या होत्या. (Anderson question Ravindra Jadeja batting)

शानदार फॉर्मात असलेल्या रूटला केवळ 31 धावाच करता आल्या. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 3 तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी एक विकेट घेतली. या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पुढे आहे तर अशा परिस्थितीत संघाने मालिका जिंकण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन म्हणाला की, रवींद्र जडेजा प्रथम क्रमांक-8 वर फलंदाजीसाठी उतरत होता. अशा परिस्थितीत आम्हाला जल्लोश करण्याची संधी कमी मिळत होती. मात्र आता तो सातव्या क्रमांकावर फलंदाज म्हणून खेळतो आहे आणि यामुळे आम्ही अडचणीत आलो आहोत. अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात 2014 मध्ये वाद झाला होता कारण इंग्लिश गोलंदाजाने भारतीय खेळाडूला पॅव्हेलियनमध्ये धक्का दिला होता आणि, त्यानंतर त्यांच्यावरही कारवाई देखील करण्यात आली होती.

जेव्हा मीडियाने रवींद्र जडेजाला अँडरसनबद्दल प्रश्न विचारला तेव्हा भारताचा अष्टपैलू खेळाडू म्हणाला की जेव्हा मी धावा करतो तेव्हा प्रत्येकजण म्हणतो की तो चांगला फलंदाज आहे. पण मला नेहमी क्रीजवर वेळ घालवायचा असतो, पुढे तो म्हणाला की, क्रीझवर माझ्या समोर कोणी ही असो, मी माझे काम करत असतो. अँडरसनला 2014 नंतर याची जाणीव झाली हे पाहणे चांगले आहे आणि मी खूप आनंदी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

SCROLL FOR NEXT