Amabti Rayudu Dainik Gomantak
क्रीडा

Ambati Rayudu: अंबाती रायडूने घेतला मोठा निर्णय, 'या' परदेशी संघाशी झाला करारबद्ध!

Ambati Rayudu, CPL: आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूने मोठा निर्णय घेतला आहे.

Manish Jadhav

Ambati Rayudu, CPL: आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारा माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूने मोठा निर्णय घेतला आहे. त्याने भारत सोडून परदेशी संघात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो इंडियन प्रीमियर लीगऐवजी परदेशातील टी-20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

रायडूने मोठा निर्णय घेतला

टीम इंडिया (Team India) आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चं प्रतिनिधित्व करणाऱ्या अंबाती रायडूने सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्ससोबत करार केला आहे, ज्यामुळे तो कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) मध्ये सहभागी होणारा भारताचा दुसरा खेळाडू बनू शकतो.

रायडू अनेक वर्षे इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) कडून खेळला. 'ESPNcricinfo' नुसार, रायडू सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स संघाकडून 'मार्की' खेळाडू म्हणून करारबद्ध झाला आहे.

यूएसए लीगमध्ये सामील झाल्याची बातमीही आली होती

आयपीएलनंतर, 37 वर्षीय रायडूने अमेरिकेतील मेजर क्रिकेट लीग (MLC) मध्ये CSK च्या टेक्सास सुपर किंग्ज फ्रँचायझीशी करार केल्याचे उघड झाले होते.

तथापि, रायडूने एमएलसीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला, कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) निवृत्तीनंतर लगेचच खेळाडूंना परदेशी लीगमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी 'कूलिंग ऑफ पीरियड' धोरण लागू करण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले होते.

मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. रायडूला या सामन्यात खेळण्याची संधी मिळाल्यास तो सीपीएलमध्ये खेळणारा प्रवीण तांबे यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरेल.

भारताकडून 61 सामने खेळले

37 वर्षीय अंबाती रायडूने (Amabti Rayudu) आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 55 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत.

यादरम्यान त्याने वनडेमध्ये 3 शतके आणि 10 अर्धशतकांच्या मदतीने 1694 धावा केल्या. त्याचवेळी, आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 10.50 च्या सरासरीने फक्त 42 धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT