Ambati Rayudu Dainik Gomantak
क्रीडा

CSK च्या रायडूने 'सुपरमॅन स्टाईल' झेल घेऊन चाहत्यांची मने जिंकली

क्रिकेटच्या कट्टर चाहत्यांना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची आठवण झाली.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामात मंगळवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघ आमनेसामने आले. या सामन्यात चेन्नईने बाजी मारली. दरम्यान, चेन्नई संघाचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने आपल्या क्षेत्ररक्षणाने चाहत्यांची मने जिंकली. (Ambati Rayudu impresses fans with stunning catch)

36 वर्षीय रायुडूने क्षेत्ररक्षणादरम्यान सुपरमॅन स्टाईलमध्ये झेल घेऊन चाहत्यांना खुश केले. क्रिकेटच्या कट्टर चाहत्यांना तर ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची आठवण झाली. आयपीएलमध्येच एका सामन्यादरम्यानही त्याने असाच झेल घेतला होता.

चेन्नईने आरसीबी विरुद्ध 23 धावांनी सामना जिंकला, या सामन्यात चेन्नई संघाने (CSK) नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 4 बाद 216 धावा केल्या. प्रत्युत्तरात बंगळुरू संघाला 9 विकेट्सवर 193 धावाच करता आल्या आणि सामना 23 धावांनी गमावला. चेन्नईचा अष्टपैलू शिवम दुबेला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले, त्याने सामन्यात 46 चेंडूत 95 धावा केल्या. शिवमने या डावात 8 षटकार ठोकले. त्याच्याशिवाय रॉबिन उथप्पाने 50 चेंडूत 88 धावांची खेळी केली. उथप्पाने 9 षटकार ठोकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT