Cristiano Ronaldo | Al Nassr Club Dainik Gomantak
क्रीडा

Cristiano Ronaldo: क्रेझ रोनाल्डोची! अल-नासरबरोबरच्या करारानंतर भर स्टेडियममध्ये चाहत्यांचा जल्लोष

रोनाल्डोच्या अल-नासरबरोबरच्या करारानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केलाय.

Pranali Kodre

Cristiano Ronaldo: फुटबॉल जगतातून काही दिवसांपूर्वीच एक मोठी बातमी आली होती. पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने सौदी अरेबियन फुटबॉल क्लब अल-नासर बरोबर अडीच वर्षांसाठी करार केला आहे. त्यामुळे सौदी अरेबियातील फुटबॉल चाहत्यांना आनंद झाला आहे.

रोनाल्डोने 2022 वर्षाच्या अखेरीत त्याने अल-नासर क्लबबरोबर करार केला असल्याचे जाहीर केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून याबद्दल चर्चा होती. पण अखेर रोनाल्डोनेच पोस्ट करून त्याच्या कराराबद्दल माहिती दिल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, असे म्हटले जात आहे की त्याने 200 मिलियन युरोचा करार केला आहे.

(Al Nassr Club fans welcome Cristiano Ronaldo)

त्याच्या या करारानंतर शनिवारी सौदी अरेबियन लीगमध्ये अल-नासर क्बलचा अल-खालिज क्लबबरोबर सामना झाला. यात अल-नासरने 1-0 असा विजय मिळवला. पण या विजयाबरोबरच अल-नासर क्लबच्या चाहत्यांनी रोनाल्डोशी क्लबने केलेल्या कराराबद्दल आनंद व्यक्त केला.

दरम्यान, रोनाल्डो या सामन्याचा भाग नव्हता. पण असे असले तरी सामन्यादरम्यान चाहते त्याच्या नावाचा नारा देत आनंद व्यक्त करत होते. चाहते रोनाल्डोच्या नावाने नारा देत असतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

दोन महिन्यांपूर्वी मँचेस्टर युनायटेड आणि रोनाल्डो यांचे मार्ग वेगळे झाले होते. त्यांनी परस्पर संमतीने त्यांच्यातील करार संपवला होता. रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायडेट क्लब यांच्यातील वाद मध्यंतरी समोर आले होते. त्यानंतरच ते वेगळे झाले. त्यामुळे आता रोनाल्डो अल-नासरकडून खेळताना दिसणार आहे.

पाचवेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकलेल्या रोनाल्डोने आत्तापर्यंत मँचेस्टर युनायटेड, रिएल मद्रिद, जुव्हेंटस असा विविध क्लबसाठी सामने खेळले आहेत. त्याने त्याच्या या विविध क्बलसाठी अनेक विजेतीपदेही जिंकून दिली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT