Akash Deep Instagram
क्रीडा

BCCI कडून RCB च्या गोलंदाजला वाढदिवसाची भेट! द. आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड

Akash Deep: बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी दीपक चाहरच्या जागेवर 27 वर्षीय गोलंदाजाची भारतीय संघात निवड केली आहे.

Pranali Kodre

Akash Deep replace Deepak Chahar in Team India for ODI Series against South Africa:

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील टी20 मालिका 1-1 अशी बरोबरी सुटली आहे. आता 17 डिसेंबरपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे, तर 26 डिसेंबरपासून 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. अशातच भारतीय संघात दोन मोठे बदल झाले.

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज दीपक चाहरचा समावेश होता. पण त्याने कुटुंबात मेडिकल एमर्जन्सी आल्याने या मालिकेतून माघार घेतली आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी मालिकेसाठी दुखापतीतून पूर्ण सावरलेला नाही. त्यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे.

दरम्यान, वनडे मालिकेसाठी दीपक चाहर जागेवर बदली खेळाडू म्हणून आकाश दीपची निवड करण्यात आली आहे. 27 वर्षीय अष्टपैलू आकाश दीप एक चांगला वेगवान गोलंदाजही आहे. त्याने नवीन आणि जुना चेंडूही स्विंग करता येतो.

दरम्यान, अद्याप त्याला भारताच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पणाची संधी मिळालेली नाही. त्याला चीनमध्ये यावर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळाली होती, पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळू शकते.

विशेष म्हणजे आकाशने नुकताच 15 डिसेंबर रोजी त्याचा 27 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी त्याची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झाल्याची घोषणा झाली. त्यामुळे त्याच्यासाठी हा वाढदिवस खास ठरला आहे.

आकाशचा जन्म 15 डिसेंबर 1996 रोजी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील डेहरी येथे झाला. आज तकने दिलेल्या माहितीनुसार आकाशला 2007 टी20 वर्ल्डकपनंतर क्रिकेटमध्ये कारकिर्द घडवण्याची प्रेरणा मिळाली.

मात्र, त्याच्या वडिलांचा त्याने क्रिकेटपटू बनावे यासाठी विरोध होता, पण त्यानंतरही त्याने क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. दरम्यान, 2007 टी20 वर्ल्डकपचा अंतिम सामना आकाशने भाड्याने जनरेटर घेऊन पाहिला होता, कारण त्यावेळी त्याच्या गावात वीज आणि पाण्याची समस्या होती.

आकाशची कारकिर्द

आकाश बंगालकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याने नुकतेच विजय हजारे ट्रॉफीमध्येही बंगालसाठी चांगली कामगिरी केली होती. त्याने या लिस्ट ए क्रिकेट स्पर्धेत 6 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या होत्या.

2019 मध्ये बंगालसाठी पदार्पण केलेल्या आकाश दीपने आत्तापर्यंत 25 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 90 विकेट्स घेतल्या आहे, तसेच 375 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर २८ लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 42 विकेट्स घेतल्या आहेत, तर 140 धावा केल्या आहेत. तो 41 टी20 सामनेही खेळला आहे, ज्यात त्याने 48 विकेट्स घेतल्या आहेत.

आयपीएल कारकिर्द

आकाश दीप आयपीएल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला आहे. त्याला आयपीएल 2021 मध्ये वॉशिंग्टन सुंदरच्या जागेवर संघात संधी दिली होती, पण त्या हंगामात तो एकही सामना खेळला नाही.

त्यानंतर आरबीसीनेच 20 लाखांच्या किंमतीत त्याला आयपीएल 2022 साठीही संघात स्थान दिले होते. त्यांनी 2023 हंगामासाठीही त्याला कायम केले होते.

आकाशने 2022 मध्ये आरसीबीकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्याला पदार्पणाची कॅप विराट कोहलीने दिली होती. आकाशने आत्तापर्यंत 7 आयपीएल सामने खेळले असून 6 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बेतुल ONGC परिसरात अग्नितांडव! वेल्डिंगच्या ठिणगीमुळे भीषण आग; प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड VIDEO

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

SCROLL FOR NEXT