Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final: रहाणेसाठी उघडलं टीम इंडियाचं दार! कसा होता गेल्या वर्षाभरातील परफॉर्मन्स

अजिंक्य रहाणेचे तब्बल 15 महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane Comeback in Team India: बीसीसीआयने मंगळवारी आगामी कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेलाही संधी मिळाली आहे.

रहाणेचे भारतीय संघात तब्बल 15 महिन्यांनंतर पुनरागमन झाले आहे. त्याने यापूर्वी भारताकडून अखेरचा कसोटी सामना 11 ते 14 जानेवारी 2022 दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये खेळला होता. त्यानंतर त्याच्या खराब फॉर्ममुळे आणि दुखापतीमुळे त्याला भारतीय संघातून त्याची जागा गमवावी लागली होती.

पण आता त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल 2023 स्पर्धेत केलेल्या कामगिरीनंतर पुन्हा भारतीय निवड समीतीचे त्याच्याकडे लक्ष वेधले आहे.

रहाणे केवळ आयपीएल 2023 स्पर्धेतच नाही, तर त्यापूर्वी झालेल्या देशांतर्गत स्पर्धांमध्येही मुंबईकडून चांगला खेळला आहे. रहाणेने डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान पार पडलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 स्पर्धेत मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या.

त्याने या रणजी स्पर्धेत 7 सामन्यांमध्ये 57.63 च्या सरासरीने 634 धावा केल्या. यामध्ये त्याच्या एका द्विशतकाचाही समावेश आहे. त्याने हैदराबादविरुद्ध हे द्विशतक ठोकले होते. तसेच त्याने आसामविरुद्ध 191 धावांची खेळीही केली होती.

याशिवाय त्याने सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत ईशान्य विभागाविरुद्ध पश्चिम विभागाचे नेतृत्व करताना 207 धावांची द्विशतकी खेळी केली होती. मात्र, या स्पर्धेत त्याला मध्य विभाग आणि दक्षिण विभागाविरुद्ध फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती.

तसेच ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 दरम्यान झालेल्या सईद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण नोव्हेंबर-डिसेंबर 2022 दरम्यान झालेल्या विजय हजारे वनडे स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी करताना 6 डावात 263 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

त्याचबरोबर सध्या रहाणे आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सकडून खेळत आहे. या हंगामात खेळताना तो तुफानी फलंदाजी करताना दिसत असून त्याने आत्तापर्यंत 5 सामने खेळले असून 52.25 च्या सरासरीने आणि 199.04 च्या स्ट्राईक रेटने 209 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

त्यामुळे नजीकच्या काळात रहाणेने रणजी ट्रॉफी आणि आयपीएल 2023 स्पर्धेत दाखवलेल्या दमदार फॉर्ममुळे पुन्हा भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश मिळवले आहे, असे म्हणता येऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT