Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

Ajinkya Rahane: उपकर्णधारपद गेलं, टीममधील जागाही गेली, पण IPL 2023 च्या पहिल्याच मॅचमधून ठोकली कमबॅकची दावेदारी

अजिंक्य रहाणेने चेन्नई सुपर किंग्ससाठी पहिलाच सामना खेळताना आयपीएल 2023 मधील सर्वात जलद फिफ्टी ठोकली आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane: भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे शनिवारी सर्वांचेच लक्ष वेधले. त्याने शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघासाठी पदार्पण केले. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना तुफानी फलंदाजी केली.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने सीएसकेसमोर 158 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सीएसकेने डेव्हॉन कॉनवेची विकेट पहिल्याच षटकात गमावली होती. त्यामुळे रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. चौथ्या षटकात त्याने 1 षटकार आणि सलग चार चौकारांसह 23 धावाही चोपल्या. तसेच त्याने 19 चेंडूतच अर्धशतक झळकावले, याबरोबरच आयपीएलच्या चालू 16 व्या हंगामात सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रमही नावावर केला.

त्याला अखेर पीयुष चावलाने बाद केले. रहाणेने 27 चेंडूत 61 धावा काढल्या. त्याने 225.93 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी करताना 7 चौकार आणि 3 षटकार ठोकले. त्याच्या या खेळीनंतर आता पुन्हा त्याला भारतीय संघात पुनरागमनाची संधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

खरंतर रहाणे गेल्यावर्षापासून फलंदाजीत संघर्ष करत होता. तो काही वर्षांपूर्वीच भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघातूनही दूर झाला आहे. पण त्याला गेल्यावर्षी भारताच्या कसोटी संघातूनही वगळण्यात आले. इतकेच नाही, तर त्याआधी त्याला भारताच्या कसोटी संघाचे उपकर्णधारपदही गमवावे लागले.

तसेच त्याला आयपीएल 2023 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या संघातून त्याला मुक्त केले होते. पण सीएसकेने त्याला आयपीएल 2023 लिलावातून त्याच्या 50 लाखाच्या मुळ किमतीत खरेदी करत संघात सामील करून घेतले.

पण रहाणेला आयपीएल 2023 मध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी सीएसकेचे काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर झाले आणि रहाणेला खेळण्याची संधी मिळाली. रहाणेनेही या संधीचा पूर्ण फायदा घेत आपल्या फलंदाजीने सर्वांना चकीत केले. त्याच्या खेळीमुळे सीएसकेला हा सामना सहज जिंकणे सोपे गेले.

टीम इंडियात होऊ शकते पुनरागमन?

खंरतर अनेकांना असा प्रश्न पडला असेल की आयपीएल हा टी20 क्रिकेटचा प्रकार आहे, पण त्याच चांगली कामगिरी करून तो भारताच्या कसोटी संघात पुनरागमन कसे करणार. मात्र, रहाणे नेहमीच त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो.

त्यामुळे जर त्याने आयपीएल 2023 मध्ये सातत्याने अशीच कामगिरी केली, तर त्याचा नक्कीच भारतीय संघातील समावेशासाठी पुन्हा विचार होऊ शकतो. कारण सध्या भारताला इंग्लंडमध्ये जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळायचा आहे आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे रहाणेचा पुन्हा विचार होऊ शकतो. तसेच रहाणेची परदेशातील कामगिरी आत्तापर्यंत प्रभावी झाली आहे, ही गोष्टही लक्षात घेतली जाऊ शकते.

याशिवाय रहाणेसाठी मर्यादीत षटकांचेही दरवाजे अद्याप बंद झालेले नाही. भारताला आगामी काळात वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. अशा परिस्थितीत भारतीय निवड समीती एकदा रहाणेला वर्ल्डकपपूर्वी मधल्या फळीसाठी आजमवून पाहू शकतात. गेल्यावर्षी दिनेश कार्तिकनेही आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत भारताच्या टी20 संघात जागा मिळवली होती. त्याप्रमाणे रहाणेसाठीही अद्याप भारतीय संघाचे दरवाजे बंद झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session:राज्यात अनेक घर फोड्या करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केलेल्या आरोपीला अटक

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT