पणजी : नागपूर येथे होणाऱ्या 32 व्या सीनियर राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचे संघ शनिवारी (ता. 26) रवाना होतील. पुरुष संघाच्या कर्णधार अजय हळगेकर याची निवड झाली असून महिला संघाचे नेतृत्व दिशा कांबळी करेल. स्पर्धा 28 ते 31 मार्च या कालावधीत होईल. (Ajay lead the men's team & Disha will lead the women's goa cricket team For tennis cricket tournament)
संघ असे : पुरुष : सैफ अली कराजगी, आकाश नाईक, यश आनंद (उपकर्णधार), शौनक पैंगीणकर, श्रीराम मळीक, अजय हळगेकर (कर्णधार), नमेश काणकोणकर, प्रसाद किनळेकर, आकाश भंडारी, सचिन पाडगावकर, प्रसाद सतरकर, निषाद सावंत, वृषभ भंडारी, सचिन कोळेकर,
महिला संघ : दिशा कांबळी (कर्णधार), पूजा ढवळीकर, रतिका नाईक (उपकर्णधार), रसिका सिरसाट, अदिती सावंत, दिव्याणी शिरोडकर, तनुजा गावकर, दीपलक्ष्मी नाईक, चैत्राली मेस्त्री, दीप्ती राऊत, वैशाली गावस, रेश्मा राठोड, प्रियांका तांबुलकर, रेहना कामत.
संघाला मेधा परुळेकर, संध्या पालयेकर, किशोर किनळेकर, प्रसाद म्हांब्रे यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला. संघाच्या व्यवस्थापकपदी वीरेंद्र माजिक व इच्छिता कळंगुटकर यांची निवड झाली असून हेमंत खोत मुख्य प्रशिक्षक आहेत.
गतवेळी महिला विजेत्या
राष्ट्रीय सीनियर महिला (Women) टेनिस बॉल क्रिकेट (Cricket) स्पर्धेत गतवेळी गोव्याच्या महिलांनी विजेतेपद मिळविले, तर पुरुष संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. तेव्हा स्पर्धा कन्याकुमारी येथे झाली होती. यावेळी नागपूर येथील स्पर्धेत पुरुष गटात 35, तर महिला गटात 25 संघांचा समावेश असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.